रात्री दहा वाजता गणेश विसर्जन मिरवणूक बंद : API डॉ प्रवीण दाईगडे
कुंभारगाव | राजेंद्र पुजारी :
अनंत चतुर्दशीच्या दिवशी कुंभारगांव, तळमावले, मानेगांव, शिबेवाडी, आणि चाळकेवाडी या परिसरातील घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांनी गणपती बाप्पांचे विसर्जन वाजतगाजत मिरवणुकीत केले. "गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" अशा जयघोषात गुलालाची उधळण करत, ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींना निरोप देण्यात आला. या मिरवणुकीत भक्तिमय वातावरण आणि भक्तांच्या उत्साहाने परिसर भरून गेला होता.

पारंपरिक वाद्यांच्या तालावर तरुणाईने ठेका धरला, तर अबालवृद्ध, युवती आणि महिलावर्ग देखील भक्तीत रंगून गेले होते. फटाक्यांची आतषबाजी आणि वाद्यांच्या गजरात परिसरातील प्रत्येक गल्ली गणेश भक्तीत दुमदुमत होती. विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्वांनी गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी बाप्पांचे दर्शन घेत भक्तिमय निरोप दिला.
काही सार्वजनिक मंडळांना बेंजो आणि बँडच्या कमतरतेमुळे विसर्जन मिरवणूक अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी काढावी लागली. मात्र, दोन्ही दिवशीही गणेश विसर्जन शांततेत पार पडले.
ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे API डॉ. प्रवीण दाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, ज्यामुळे हा उत्सव कोणताही अनुचित प्रकार न घडता संपन्न झाला.