कुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
गणेश चतुर्थीनिमित्त कुंभारगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या ३५५ पैकी ३२२ पात्र लाभार्थ्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा जिन्नस संच वितरणाचा शुभारंभ संपन्न झाला. या योजनेतून केवळ १०० रुपये शुल्कात लाभार्थ्यांना एक किलो चणा डाळ, साखर, सोयाबीन तेल, आणि रवा यांचा संच देण्यात आला.

पात्र लाभार्त्याना अन्नपूर्ण योजनेचा जिन्नस संच वितरण प्रसंगी बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक डॉ. दिलीपराव चव्हाण, विविध कार्यकारी सेवा सोसायटी कुंभारगांव चे चेअरमन रामराव इनामदार, सद्गुरू विकास सोसायटी शेंडेवाडी चे चेअरमन राजेंद्र पाटील, सोसायटी कुंभारगांव चे संचालक राजेंद्र पुजारी, कुंभारगांव ग्रामपंचायतीचे सदस्य नामदेव खटावकर, शिवदौलत बँक शाखेचे माजी मॅनेजर संभाजी चव्हाण, सेल्समन ईश्वर मोरे आणि विलास मोरे यांच्या उपस्थित वाटप करण्यात आले.
या योजनेतून पात्र लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत पुनर्भरणाची सुविधा मिळणार आहे. या योजनेचा उद्देश महिलांचे सक्षमीकरण, स्वच्छ इंधनाचा प्रसार आणि पर्यावरण संरक्षण आहे.