पारंपरिक वाद्य वाजवून परंपरा जपा डीजे, डॉल्बी वाजवल्यास कारवाईचा बडगा उगारणार : API डॉ प्रवीण दाईंगडे


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
ढेबेवाडी पोलीस स्टेशन येथे गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील गणेशोउत्सव मंडळांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे प्रशांत चव्हाण, हवालदार नवनाथ कुंभार सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष, सदस्य उपस्थित होते.

 या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना API डॉ. प्रवीण दाईंगडे म्हणाले की, गणेशोउत्सव शांततेत व धार्मिक वातावरणात पार पाडा. गणेश विसर्जन उत्सवाचे पावित्र्य राखण्याचे सर्वांची जबाबदारी आहे मंडळांनी कर्णकर्कश आवाज करून नागरिकांचे आरोग्य धोक्यात अनु नये आपण पारंपरिक वाद्य वाजवून परंपरा राखा या गणेशोउत्सव विसर्जन मिरवणुकी दरम्यान जातीय तेढ निर्माण होऊ नये तसेच मिरवणूक दरम्यान,वादविवाद टाळा, प्रत्येक मंडळाने डॉल्बी, लेझर लाईट, याचा वापर करायचं नाही आपण ढोल पथक, बेंजो याचा वापर करू असे ते बोलताना म्हणाले.

 यावेळी उपस्थित मंडळातील अध्यक्ष, सदस्यांनी आपली मते व्यक्त केली की आम्ही गणेश उत्सवाच्या आधी दोन महिने डॉल्बी बुक केला आहे, डॉल्बीला ऍडव्हान्स दिले आहे या प्रश्नाला उत्तर देताना API डॉ. प्रवीण दाईंगडे म्हणाले आपण प्रशासनाला सहकार्य करा तसेच सर्व सार्वजनिक मंडळांनी पारंपरिक वाद्य वाजवूनच गणेश विसर्जन मिरवणूक साजरी करावी.