स्वच्छ, पारदर्शक कारभाराने लोकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या तळमावले येथील जन विकास नागरी पतसंस्थेच्या कराड शाखेचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या शुभहस्ते जनविकास सहकारी पतसंस्थेच्या कराड शाखेचा शुभारंभ संपन्न झाला.
यावेळी ना. शंभूराज देसाई यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला व जनविकास पतसंस्थेच्या पारदर्शक कारभाराचे कौतुक केले. संस्थेचे चेअरमन बाळकृष्ण काजारी तसेच संस्थेचे सर्व संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र काजारी यांचे त्यांनी कौतुक करून संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई दादा तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई दादा, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जि.प.सदस्य विजय पवार नाना, पाटण बाजार समिती उपसभापती विलास गोडांबे, पंजाबराव देसाई,शिव दौलत बँकचे मा.चेअरमन मिलिंद पाटील, शिवाजीराव पवार, शिवशाही सरपंच सघाचे अध्यक्ष विजय शिंदे,अनिल शिंदे, दत्तात्रय चोरगे, विष्णू पवार, जयवंत पवार, मनोज मोहिते, ज्योतीराज काळे, रणजीत पाटील, सचिन पाटील सर्व संचालक कर्मचारी व्यापारी हितचिंतक उपस्थित होते.
संस्थेचे चेअरमन बाळकृष्ण काजारी व संचालक मंडळाने सर्व मान्यवरांचे उत्साहात स्वागत केले.