लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार..

पाटण तालुक्यातील भोसगाव येथील धक्कादायक प्रकार; एकावर गुन्हा दाखल



ढेबेवाडी|कृष्णाकाठ वृत्तसेवा: पाटण तालुक्यातील भोसगाव येथील एका मुलीवर लग्नाचे अमीष दाखवून वारंवार अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडीस आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून ढेबेवाडी पोलीस ठाण्यात संशयित आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पाटण तालुक्यातील ढेबेवाडी भागातील भोसगाव येथील पिडीत मुलगी व आरोपी यांचे एकत्र शिकत असल्यापासून प्रेमसंबध आहेत. आरोपीने पिडीत मुलीस ती अल्पवयीन असल्यापासून तिला लग्नाचे अमीष दाखवून, तसेच प्रेमाचे नाटक करुन तिचा गैरफायदा घेत वारंवार तिच्या घरात जावून, तसेच तिला आपल्या राहते घरी बोलावून तिच्यासोबत शारीरिक संबध प्रस्तापित केले. त्यांनतर संबंधित पिडीत मुलीने लग्न करण्यासाठी तगादा लावला असता आरोपीने तिला उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच पिडीत मुलीस काहीही न सांगता त्याने मागील महिन्यात दुसऱ्या मुलीसोबत साखरपुडा करुन पिडीत मुलीस फसवून तिला लग्नाचे अमीष दाखवून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबध ठेवले आहेत. याप्रकरणी सदर पिडीत मुलीने ढेबेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उप विभागीय अधिकारी विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलजा पाटील अधिक तपास करीत आहेत.