पानवळवाडी येथील श्री गणेश मंदिरासमोरील सभामंडपाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न.


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा: नामदार शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून सार्वजनिक बांधकाम विभाग, सातारा कोयना भूकंप पुनवर्सन निधी मधून पानवळवाडी (मालदन) येथे गणेश मंदीरासमोर सभा मंडप बांधकाम करण्यासाठी १२ लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सभामंडपाच्या कामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. 

या वेळी मालदनचे उपसरपंच जोतीराज काळे, मान्याचीवाडीचे सरपंच रवींद्र माने, मनोज मोहिते, रणजीत पाटील, अंकुश महाडीक, नाना साबळे, राहुल पेंढारकर, प्रशांत घारगे, पत्रकार राजेश पाटील आदी मान्यवर व  मालदन ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, विभागातील शिवसेनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री गणेश मंदिरासमोरील सभा मंडपाचे भूमिपूजन झाल्याने पानवळवाडी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण होते. 

यावेळी पानवळवाडीतील ग्रामस्थांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्राध्यापक अधिकराव कणसे यांनी केले तर पत्रकार चंद्रकांत चव्हाण यांनी नामदार शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून मालदन व पानवळवाडी येथे झालेल्या विविध विकास कामांची माहिती ग्रामस्थांना दिली व नामदार शंभूराज देसाई यांचे आभार व्यक्त करून सर्व उपस्थित  मान्यवरांचे आभार मानले.