जनतेत मिसळून सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन अधिकाऱ्यांनी काम करावे : पालकमंत्री शंभूराज देसाई


पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा पाटण चे उपविभागीय अधिकारी सुनील गाढे याना पाटण उपविभागात 3 वर्ष पूर्ण झाल्याने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार त्यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच नियुक्ती झाली आहे.त्यांचे जागी सोपान राव टोणपे यांची प्रांताधिकारी या पदावर नियुक्ती झाली असून त्यांनी देखील अलीकडेच पदभार स्वीकारला आहे. त्याप्रसंगी सुनील गाढे याना निरोप देण्यासाठी आयोजित नागरी सत्कार सोहळ्यामध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी वरील प्रतिपादन केले.

 पाटण चे प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी गेली 3 वर्षे पाटण मधील जनतेत मिसळून कामे केली.कोणताही गट तट न पाहता सर्व सामान्य जनतेची कामे सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन व तत्परतेने केल्याने अल्पावधीतच ते पाटण मध्ये लोकप्रिय झाले असे त्यांनी नमूद केले .

त्यांच्या याच कामाची दखल घेऊन सन 2022 मध्ये उत्कृष्ट उपजिल्हाधकारी म्हणून जिल्हा प्रशासनाने देखील गौरविले होते

 पालकमंत्री श्री शंभूराज देसाई यांनी त्यांचा आज मरळी येथे आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात सार्वजनिक रित्या सपत्नीक सत्कार केला.

या प्रसंगी त्यांनी सांगितले की पाटण चे प्रांताधिकारी सुनील गाढे हे सकारात्मक दृष्टिकोन असणारे अधिकारी आहेत.कोणत्याही प्रशासकीय अडचणींवर तोडगा काढण्याची त्यांची नेहमी तयारी असते भूकंप ग्रस्त दाखला पणतू खापर पणतू पर्यंत करण्यासाठी खालून सकारात्मक प्रस्ताव आल्याने भूकंप ग्रस्ताच्या चौथ्या व पाचव्या पिढीला लाभ देण्यात यश आले आहे. या एका चागल्या निर्णयामुळे पाटण मध्ये अनेक तरुणांना पोलीस विभाग,महसूल विभाग, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग इत्यादी विविध ठिकाणी शासकीय विभागात रोजगार उपलब्ध झाला आहे. प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी चांगले काम केल्याने भविष्यात त्यांना पुन्हा सातारा जिल्ह्यात आणण्याचा प्रयत्न नक्कीच राहील असेही पुढे त्यांनी नमूद केले. सातारा जिल्ह्यात चांगले अधिकारी शोधून शोधून आणले जातात असे पुढे नमूद करून त्यांनी यासंदर्भात पोलीस अधीक्षक श्री समीर शेख यांचे उदाहरण दिले. नवीन प्रांत अधिकारी व तहसीलदार हे देखील तालुक्यात चांगले काम करतील अशी अपेक्षा देखील त्यांनी या निमित्ताने व्यक्त केली.

या प्रसंगी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सुनील गाढे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

निरोप समारंभात मनोगत व्यक्त करताना प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी सांगितले की पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे नेतृत्वाखाली विकास कामाची गंगा पाटण तालुक्यात मोठ्या प्रमाणात आली आहे.अनेक गावात कामे पूर्ण झाल्याने ग्रामस्थांकडून कामाची मागणीच शिल्लक राहिली नाही अशी परिस्थिती आहे.तालुक्यात असंख्य पुल,रस्त्याची कामे झाल्याने तालुक्याची प्रगती होत आहे. भूकंप ग्रस्त दाखल्यांच्या चौथ्या पिढीला लाभ देण्याचा मोठा विषय पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे माध्यमातून मार्गी लागल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. प्रशासकीय कामाच्या निमित्ताने तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांशी मैत्री चे संबंध निर्माण झाले होते. नेहमी संपर्क येत असल्याने पप्या,बापू पिंट्या,अन्ना, दादा, बारक्या, इत्यादी कार्यकर्त्यांची टोपण नावे देखील आपल्याला परिचित झाली होती.त्यामुळे प्रशासकीय कामे पार पाडताना कधीही अडचण आली नसल्याचे पुढे त्यांनी नमूद केले.तसेच सातारा जिल्ह्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली भविष्यात देखील काम करण्यास नक्कीच आवडेल असे शेवटी नमूद केले. 

या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रस्ताविक जिल्हा परिषद सदस्य विजय पवार यांनी प्रस्ताविक केले. तर बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे व्हा चेअरमन अशोक अण्णा पाटील यांनी आभार व्यक्त केले.

याप्रसंगी नवोदित प्रांताधिकारी सोपान टोणपे, पोलीस उपअधीक्षक विजय पाटील,तहसीलदार अनंत गुरव,कोयना जलसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितेश पोतदार, विविध विभागाचे तालुका स्तरीय अधिकारी, विविध भागातील पदाधिकारी तसेच जनता दरबार साठी पाटण तालुक्याच्या काना कोपऱ्यातून आलेले सर्व सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणत उपस्थित होते.

______________________________

"प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी तालुक्यात चांगले काम केले आहे. जाता जाता त्यांनी नवीन प्रांत अधिकारी सोपान टोणपे याना कानमंत्र देऊन जावा " असे उदगार पालकमंत्री यांनी भाषणं दरम्यान काढताच उपस्थितांमध्ये मोठा हशा पिकला .