श्री संतकृपा शिक्षण संस्थेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

डॉ.रामलिंग पत्रकार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न



घोगाव|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
घोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या प्रांगणात ध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. रामलिंग पत्रकार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक रमेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संचलन केले व स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमात उत्साहाचा रंग भरला. विद्यार्थिनींनी देशभक्तीची गाणी सादर केली.

बी.टेक.चे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, बी. फार्मसी चे प्राचार्य डॉ. रामलिंग पत्रकार ,डी फार्मसी च्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील, जुनिअर कॉलेजच्या प्राचार्या सौ. पुष्पा पाटील, इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या सौ. मनिषा हरळीकर आदी मान्यवर स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात उपस्थित होते.

या वेळी मान्यवरांच्या हस्ते श्री संतकृपा कॉलेज ऑफ डी फार्मसीच्या न्यूज लेटरचे व श्री संतकृपा इंजिनिअरिंग कॉलेजच्या ई मॅगझिनचे प्रकाशन करण्यात आले.  

या नंतर ज्युनिअर कॉलेजच्या एच. एस. सी बोर्ड परीक्षा 2024 च्या परीक्षेतील पहिल्या तीन गुणवंत विद्यार्थ्यां चा सुद्धा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय पारितोषक मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा सुद्धा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्री संतकृपा इंटरनॅशनल स्कूल मधील मंथन परीक्षेतील यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी सर्व महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने या समारंभास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुनिता सुतार यांनी मानले.