"वांगव्हॅली क्रेडिट सोसायटी" राज्यस्तरीय दीपस्तंभ उत्कृष्ट कामगिरी पुरस्काराने सन्मानित


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा: सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असणारी, सहकार क्षेत्राबरोबर सामाजिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या वांग व्हॅली को ऑप क्रेडिट सोसायटीला राज्य पतसंस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर व दीपस्तंभ पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामाची नोंद घेऊन राज्यस्तरीय पतसंस्था फेडरेशनच्या वतीने दीपस्तंभ हा पुरस्कार देऊन वांग व्हॅली को ऑप क्रेडिट सोसायटीचे चेअरमन सुभाष बावडेकर, संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सुभाष बावडेकर, संचालक हणमंत मोळावडे यांना सन्मानित करण्यात आले.

या सोहळ्यास कॉसमॉस बँकेचे विद्यमान चेअरमन मिलिंद काळे, फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, गोदावरी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.च्या अध्यक्षा राजेश्री पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

वांग व्हॅली को-ऑप क्रेडिट सोसायटीला मिळालेल्या पुरस्काराबद्धल सुभाष बावडेकर याचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात आले. वांग व्हॅली संस्थेने ग्रामीण भागात तळमावले तसेच मुंबई येथे आत्तापर्यंत विविध लोकहिताचे उपक्रम राबवले आहेत.