माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर
कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा: सैदापूर येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सैदापूर गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील सुधारणा करणेसाठी तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या सुशोभीकरणसाठी मागणी केली होती त्यानुसार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला असून त्यास प्रशासकीय मंजुरी सुद्धा मिळाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. यासाठी गावातील छ. शिवाजी महाराजांचे स्मारक हे प्रेरणा देणारे ठरावे यासाठी सैदापूर गावातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी या चौकाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याप्रमाणे प्रस्ताव माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सादर केला. त्यानुसार आ. चव्हाण यांनी सुद्धा आलेल्या प्रस्तावाची दखल घेऊन लवकरात लवकर निधी मिळण्यासाठी प्रयत्न केले त्यानुसार हा निधी मंजूर झाला आहे. सैदापूर गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व चौकाचे सुशोभीकरण व सुधारणा चांगल्या पद्धतीने करता येणार आहे, मंजूर निधीमुळे सैदापूर ग्रामस्थ व शिवप्रेमीनी आनंद व्यक्त केला आहे.