ग्रामीण भागातील विद्यार्थीही अधिकारी बनू शकतात : वनाधिकारी कु.मृगजा यादव


मलकापूर | कृष्णाकाठ वृत्तसेवा: ग्रामीण भागात शिक्षण घेत असताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून स्पर्धा परीक्षा दिल्या की कष्टकरी शेतकरी यांची मुलेही अधिकारी बनू शकतात.विद्यार्थ्याने योग्य दिशेने स्पर्धा परीक्षेची तयारी केली की त्यात यश मिळवणे सोपे जाते. वाचन ,कष्ट करण्याची तयारी, जिद्द ,सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास या गोष्टींच्या बळावर यश मिळवणे सोपे जाते.असे प्रतिपादन वनाधिकारी कु.मृगजा यादव यांनी केले.श्री मळाई देवी शिक्षण संस्थेच्या आदर्श ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थी,विद्यार्थिनी यांच्याशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी विद्यार्थ्यांना करिअर विषयी त्यांनी मार्गदर्शन केले.व स्पर्धा परीक्षा देताना स्वतःला आलेले अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. स्पर्धा परीक्षेच्या संदर्भातील विविध प्रश्नांचे शंका निरसनही केले. 

    याप्रसंगी श्री मळाई देवी शिक्षण संस्थेचे सचिव शेती मित्र अशोकराव थोरात,जालिंदर यादव, सौ.सुमित्रा यादव, श्री मळाई देवी शिक्षण संस्थेचे संचालक प्रा.संजय थोरात , माजी उपप्राचार्य श्री.एस.बी.शिर्के , प्राचार्या सौ.ए.एस कुंभार,सौ एस.डी.पाटील, प्राध्यापक,विद्यार्थी,विद्यार्थिनी उपस्थित होते.श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या वतीने मृगजा यादव यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आर. डी.पाटील यांनी केले,आभार प्रा एस.एम.धोंगडे यांनी मानले.