नवभारत इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये भरली विठू नामाची शाळा.

आषाढी एकादशी निमित्त छोट्या वारकऱ्यांचा दिंडी सोहळा उत्साहात संपन्न



कुंभारगांव|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
कुंभारगांव ता पाटण येथील नवभारत इंग्लिश मिडीयम स्कुल च्या वतीने आषाढी एकादशी च्या पार्श्वभूमीवर शाळेतील विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा उत्साहात भक्तीमय व विठ्ठल नामाच्या गजरात संपन्न झाला.

वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर अशा विठ्ठलमय व भक्तिमय वातावरणात शाळेत विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळाही रंगला. 


यावेळी वारकरी वेषातील विद्यार्थ्यांनी टाळ, मृदंग च्या तालावर ज्ञानेश्वर माऊली तुकारामा चा गजर करून परिसर दणाणून सोडला यावेळी या छोट्या वारकऱ्यांनी गळ्यात टाळ, हातात भगवा पताका विठ्ठल रखुमाई, वारकरी यांची वेशभुषा केली होती. 

   पालखी नवभारत इंग्लिश स्कुल पासून ग्राम प्रदक्षिणा करून सांस्कृतिक भवन येथे टाळ, मृदंग याचेवर "ज्ञानोबा माऊली तुकाराम "ज्ञानोबा माऊली तुकाराम चा गजर करत गोल रिंगण केले हे रिंगण या दिंडी सोहळ्याचे आकर्षण ठरले.

 हा दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी नवभारत इंग्लिश स्कुल कुंभारगांव च्या सर्व मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी अनिता शेटे, भारती शेटे यांनी परिश्रम घेतले.

या वेळी मुख्याध्यापिका प्रिती गुरव,शिक्षिका वृशाली मोरें,अर्चना पुजारी, निलम मोरें, पल्लवी कदम, भाग्यश्री पानवळ, नंदा माने, अक्षदा किर्तने, ललिता मोरें, अत्तार मॅडम, हरिदास साळुंखे, अक्षय पाटील विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते.