कुंभारगांव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान


 कुंभारगांव | कृष्णाकाठ वृत्तसेवा: श्री क्षेत्र कुंभारगांव ता पाटण येथील श्री वाल्मिक ऋषींच्या तप;सामर्थ्याने वै, येसुबुवा उर्फ साधूबाबा, वै तातुबुवा कवर महाराज (झेंडेकरी)यांचे पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतून श्री क्षेत्र कुंभारगांव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान आज गुरुवार 4 जूलै रोजी सकाळी वारकरी, ग्रामस्थ, युवक वर्ग यांचे उपस्थितीत झाले. 

कुंभारगांव ला अध्यात्मिक महत्व असल्याने या आषाढी वारकरी पायी दिंडी सोहळ्याला १७ वर्षाची परंपरा आहे. वै येसुबुवा उर्फ साधूबाबा, वै तातुबुवा कवर (झेंडेकरी )यांनी कुंभारगावाला अध्यात्माची परंपरा घालून दिली आहे. या आषाढी वारी साठी परिसरातील गाव, वाडी वस्तीतील वारकरी, महिला, युवक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या पायी दिंडी सोहळ्याचे दिंडी चालक ह,भ,प, यशवंत महाराज यांनी या पायी दिंडीची सुरुवात केली यंदा अठरावे वर्ष आहे. या दिंडी सोहळ्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे सहभागी होणाऱ्या वारकऱ्या कडून कोणतेही 

 मानधन घेतले जात नाही. देणगी स्वरूपात येणाऱ्या देणगीतून या पायी दिंडी सोहळ्या साठी वाहतूक करणाऱ्या ट्रॅकटर, भजनी मंडळ, किर्तनकार, जाहिरात,साऊंड सिस्टीम आदींचा खर्च केला जातो. परंतु या दिंडी सोहळ्यातील वारकर्यांना अनेक अन्न दाते अन्न दान करतात. या पायी दिंडी सोहळ्याला अध्यात्माची परंपरा घालून दिलेल्या वै येसुबुवा उर्फ साधुबुवा यांचे फलटण येथील राजुरी या ठिकाणी असलेल्या वै येसुबुवा उर्फ साधुबुवा मंदिरात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा विसावतो.   

 कुंभारगांव ता पाटण येथून पंढरपूरकडे जाण्यासाठी पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान झाले तेव्हा वारकरी यांनी टाळ, मृदंगाच्या गजरात विठुरायाचा गजर करत, परिसर दणाणून सोडला ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम चा गजर करत तळमावले मार्गे दुपारी कोळे, सायंकाळी कराड मारुतीबुवा मठ, 5 जूलै सकाळी वाघेरी बोरजाईमळा,दुपारी शामगांव, सायंकाळी राजाचे कुर्ले, 6 जूलै सकाळ, दुपार,पुसेसावळी, सायंकाळी औध, 7 जूलै सकाळी वरुड, दुपारी सिद्धेश्वर किरोली, सायंकाळी वडूज, 8 जूलै सकाळ मांडवे, दुपारी पिंगळी, सायंकाळी गोंदवले, 9 जूलै दुपारी वावरहिरे, सायंकाळी शिंगणापूर, 10 जूलै सकाळी कोथळे दरस वस्ती, दुपारी कोथळे, सायंकाळी राजुरी वै येसुबुवा उर्फ साधुबुवा मंदिर, 11 जूलै सकाळ, दुपार राजुरी, सायंकाळी नातेपुते, 12 जूलै दुपारी मांडवी सायंकाळी माळशिरस, 13 जूलै दुपारी खुडूस सायंकाळी वेळापूर, 14 जूलै दुपारी तोंडले- बोंडले ओढा सायंकाळी भंडी शेगांव 15 जूलै दुपारी,सायंकाळी वाखरी, 16 जूलै दुपारी सायंकाळी पंढरपूर कुंभारगांवकर मठ मुक्काम असा या सोहळ्याचा कार्यक्रम आहे.