मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस पाटण मध्ये प्रचंड प्रतिसाद


पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा: शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेस महिलांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या पाटण मध्ये दिसून येत आहे

पाटण मध्ये आज दुसऱ्या दिवशी देखील सेतू कार्यालय, महा ई सेवा केंद्र, तलाठी ग्रामसेवक यांची कार्यालय या महिलांच्या गर्दीने फुलून गेली असल्याचे चित्र संपूर्ण पाटण तालुक्यात दिसून येत होते.

तहसीलदार अनंत गुरव व प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी या योजनेसाठी लागणारे कागदपत्र ग्रामीण स्तरावर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने गावोगावी आयोजित केलेल्या कॅम्प साठी तारळे महसूल मंडळात भेट देऊन ग्रामस्तरिय कर्मचारी यांचे मार्फत करण्यात येत असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला, 

तसेच या योजनेची नेमकी माहिती नसल्याने या योजने बाबत जनजागृती देखील करणे आवश्यक असल्याने अशा काही कॅम्प मध्ये या योजनेची सविस्तर माहिती देखील देण्यात येत आहे.



सामाजिक अर्थसहाय्य योजनेत समाविष्ट असणारे लाभार्थी या योजनेसाठी पात्र नसल्याने त्यांनी अर्ज करू नये आयकर भरणाऱ्या महिला, 2.50 लक्ष पेक्षा जास्त कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या महिला या योजनेच्या निकषात बसत नसल्याने त्यांनी यासाठी अर्ज करू नये. याव्यतिरिक्त या योजनेच्या निकषात बसणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने उत्पन्नाचा दाखला व रहिवासी दाखला मिळविण्यासाठी महिलांनी स्थानिक तलाठी कार्यालयात धाव घेतली आहे या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना सुलभ रितीने उत्पनाचा दाखला व रहिवासी दाखला मिळण्यासाठी स्थानिक महसूल प्रशासनाचे अधिकारी लक्ष ठेऊन आहेत.

तारळे महसूल मंडळातील मुरुड या गावी स्थानिक तलाठी निलेश चव्हाण यांनी केवळ दोन तासात सुमारे 300 महिलांना वरील कागदपत्रे उपलब्ध करून दिली आहेत 

प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी दिलेल्या माहितीनुसार आज संपूर्ण पाटण तालुक्यामध्ये सुमारे 10000 पेक्षा अधिक महिलांना त्यांना आवश्यक असलेली प्रमाणपत्रे देण्यात आल्याचे सांगितले आहे.

 या योजनेसाठी लागणारे कागदपत्र तसेच काही महिला या वारीसाठी बाहेरगावी असल्याने यासाठी मुदत वाढ मिळण्याची भावना काही महिलांनी बोलून दाखविली आहे एकंदरीत या योजनेमुळे पात्र महीलाच्या अपेक्षा उंचावल्या असल्याने सर्व ग्रामस्तरिय तसेच तालुका स्तरीय सेतू व तहसील कार्यालयात सध्या याच योजनेसाठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.

_________________________________

पाटण मध्ये 21 ते 60 या वयोगटात सुमारे 1.12 लक्ष महिला असून सुमारे 50 हजर पेक्षा अधिक महिला या योजनेसाठी पात्र ठरतील असा प्राथमिक अंदाज आहे. प्रत्यक्ष अर्ज प्राप्त झाल्यानंतर ही संख्या निश्चितपणे कळेल. मात्र तोपर्यंत सर्व पात्र लाभार्थी याना आवश्यक ते प्रमाणपत्र लवकर मिळेल या दृष्टीने आवश्यक ते नियोजन करण्यात येत आहे.तसेच याबाबत शासनाकडून जे बदल वेळोवेळी सुचविण्यात येईल त्यानुसार कार्य वाही करण्यात येईल

- प्रांताधिकारी सुनील गाढे

_________________________________