कुंभारगांव आठवडी बाजार काँक्रीटीकरण झालेल्या जागेवर स्थलांतर, व्यापारी व ग्राहकांमध्ये समाधान.


कुंभारगांव | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
कुंभारगांव ता पाटण येथील आठवडी बाजार दर सोमवारी बाजारतळ या ठिकाणी फार पूर्वीपासून भरत आहे. हा बाजार रहदारीच्या मार्गावरील बाजारतळावर भरवला जात होता. मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाजी पाला विक्रते बसून भाजी पाला ग्राहकांना विक्री करत असत त्यामुळे खरेदी साठी बाजारतळ गर्दीने फुलून जात असत. पावसाळ्यात पाणी व चिखल याचा नाहक त्रास बाजारकरू, विक्रते यांना सहन करावा लागत होता अश्यातच या वेळी बाजारातूनच टू व्हीलर, फोरव्हीलर, ट्रॅक्टर, डम्पर यांची जीवघेणी वाहतूक चालू असते या दरम्यान वाहन चालक व बाजारकरू यांचे वादावादीचे प्रसंग अनेकदा झाले आहेत या जीवघेणी समस्येबाबत अनेक जागरूक नागरिकांनी आवाज उठवला होता परंतु याकडे संबधितानी दुर्लक्ष्य केले होते अखेर, 1 जूलै सोमवार रोजी कुंभारगांव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच राजेंद्र पाटील, सदस्य किशोर चव्हाण, युवक वर्ग यांनी एकत्र येत व्यापाऱ्यांशी समन्वय साधून त्यांना बाजार तळाच्या पश्चिम बाजूला संरक्षण भिंती लगत नवीनच काँक्रीटीकरण झालेल्या जागेवर बाजार साठी जागा उपलब्ध करुन दिली याबाबत व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त करत माजी उपसरपंच राजेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य किशोर चव्हाण, युवक वर्ग यांचे आभार मानले.