सभासदांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच 'जनसहकार' अग्रस्थानी : चेअरमन मारुतीराव मोळावडे
गरजूंना आर्थिक मदतीचा हात देऊन स्वावलंबी बनवण्यासाठी "जन सहकार" सहकारातील एक खणखणीत नाणे आहे. अल्पावधीतच जन सहकार नागरी सहकारी पतसंस्थेने पारदर्शक कारभाराने ग्राहकांचा विश्वास संपादन करून प्रगतीची गरुड भरारी घेतली आहे.
जनसहकार नागरी सहकारी पतसंस्थेने ३० कोटींच्या ठेवी व १७ कोटींची कर्जे असा एकूण ४७ कोटींच्या संमिश्र व्यवसाय केला आहे. सभासदांनी संस्थेवर दाखविलेल्या विश्वासाचीच ही पोचपावती असल्याचे मत जनसहकार उद्योग समूहाचे प्रमुख व केंद्रीय दिशा समितीचे सदस्य मारुतीराव मोळावडे यांनी व्यक्त केले. कोपरखैरणे येथील जनसहकार पतसंस्थेचा वर्धापनदिन रविवार, दि. २३ रोजी उत्साहात पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी संस्थेचे संचालक मंडळ व सल्लागार समितीच्या सदस्यांचे हस्ते वाहनांचे दुचाकी व चारचाकी वितरण करण्यात आले. कार्यक्रमास नवी मुंबई सभासदांना महापालिकेचे सदस्य, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर येथील मूळ रहिवासी, परंतु, उद्योग-व्यवसाया निमित्त मुंबईत स्थायिक असलेले नागरिकांनी संस्थेबद्दल आत्मीयता व संस्थेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
संस्थेच्या वतीने मारुती माळवडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला.