तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
ढेबेवाडी पोलीस स्टेशनच्या वतीने गोरगरीब, होतकरू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
ढेबेवाडी पोलीस स्टेशनच्या वतीने गोरगरीब, होतकरू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
तळमावले येथील काकासाहेब चव्हाण विद्यालयातील वांग व्हॅली वस्तीगृहातील गोरगरीब विद्यार्थ्यांना ढेबेवाडी पोलीस स्टेशन हद्दीमधील गणेश उत्सव मंडळे व दुर्गादेवी उत्सव मंडळे यांचेकडून जमा झालेल्या वह्यांचे चे वाटप ढेबेवाडी पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलजा पाटील यांचे हस्ते करण्यात आले. अशा प्रकारे ढेबेवाडी पोलिसांनी एक सामाजिक बांधिलकी जोपासलेली आहे.या प्रसंगी ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार नवनाथ कुंभार, पोलीस हवालदार प्रशांत चव्हाण, वस्तीगृहातील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.