कुंभारगाव बोर्गेवाडी येथील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा ना. शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश
तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
कुंभारगाव बोर्गेवाडी ता पाटण येथील कुंभारगांव ग्रामपंचायत सदस्य धनाजी बोरगे व इतर कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांची शासकिय विश्रामगृह पाटण येथे भेट घेऊन शिवसेना पक्षात प्रवेश केला.   

कुंभारगांव ग्रामपंचायत सदस्य धनाजी रामचंद्र बोरगे , ग्रामस्थ एकनाथ निवृत्ती बोरगे, आनंदा बाबुराव बोरगे, निलेश सुरेश बोरगे, रामचंद्र खाशाबा बोरगे, राजेंद्र रामचंद्र बोरगे, सुरेश मारुती बोरगे, रामचंद्र निवृत्ती बोरगे, लक्ष्मीबाई तानाजी बोरगे, सोनाबाई बंडू बोरगे, संगीता रामचंद्र बोरगे, छायाताई मोहन बोरगे, कलावंती बबन बोरगे, हिराबाई संपत बोरगे, विजया विलास बोरगे, लक्ष्मी आनंदा बोरगे, मनीषा आबासो बोरगे व वंदना राजेंद्र बोरगे आदी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना पक्षात आज जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशाने कुंभारगांव गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मध्ये खिंडार पडले आहे. 

यावेळी ना. शंभूराज देसाई यांनी सर्वांचे शिवसेना पक्षात स्वागत केले आणि पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या कुंभारगाव बोर्गेवाडी गावच्या ग्रामस्थांनी आम्ही करत असलेल्या विकासाच्या राजकारणाला साथ देण्याची भूमिका घेतली आहे, याचा आनंद असल्याची भावना ना. शंभूराज देसाई यांनी याप्रसंगी व्यक्त केली. तसेच कुंभारगाव बोर्गेवाडी गावच्या सर्वांगीन विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी आश्वस्त केले. 

यावेळी डॉ. दिलीपराव चव्हाण तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.