10 वी व 12 विचे निकाल नुकतेच जाहीर झाल्याने सध्या शालेय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची कागदपत्राची जुळवाजुळव सुरू आहे शालेय किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये म्हणून जिल्हाधिकारी सातारा यांनी मंडळ स्तरावर शिबिर घेऊन विद्यार्थ्यांना त्यांचे महसूल मंडळात च दाखला मिळेल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्याला अनुसरून निवासी उपजिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पाटण प्रांताधिकारी सुनील गाढे व तहसीलदार पाटण अनंत गुरव यांनी महा ई सेवा केंद्राची व मुख्याध्यापक यांची बैठक घेऊन दाखले आवश्यक असणारे विद्यार्थी यांची यादी तयार करण्यात आली.आवश्यक ते कागदपत्र प्राप्त करून घेण्यात आले व त्यानुसार आज पाटण उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रातिनिधिक स्वरूपात 20 विद्यार्थ्यांना दाखले वाटप करून या मोहिमेस सुरुवात केली असून आतापर्यंत या शिबिरात 630 विद्यार्थ्यांचे दाखले तयार करण्यात आले असून त्याचे मंडळ निहाय वितरण करण्यात येत आहे त्यासाठी वेळापत्रक देखील तयार करण्यात आल्याची माहिती तहसीलदार पाटण यांनी दिली.
तसेच अजूनही ज्या विद्यार्थ्यांना दाखले आवश्यक असतील त्यानी त्यांचे शाळेचे किंवा महाविद्यालयाचे मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांचे मार्फत स्थानिक महा ई सेवा केंद्र यांचेकडे कागदपत्र जमा करावीत म्हणजे त्यांना तत्परतेने दाखले देता येईल असे आवाहन प्रांताधिकारी व तहसीलदार पाटण यांनी केले आहे पाटण मंडळातील दाखल्याचे शिबिर यशस्वी करण्यासाठी नायब तहसीलदार पंडित पाटील प्रभारी ना, तहसिल विलास गभाले,तसेच तलाठी जयेश शिरोडे,प्रवीण होळकर,सुनील पाटील तसेच स्थानिक कोतवाल यांनी परिश्रम घेतले आहे.
______________________________
पाटण तालुक्यातील महसूल प्रशासन हे विद्यार्थ्यांना दाखले देण्यासाठी नेहमीच तत्पर असते.प्रसंगी कार्यालयीन वेळेनंतर किंवा सुटीच्या दिवशी देखील दाखले मिळतात. त्याबद्दल पाटण महसूल प्रशासनाचे एक पालक म्हणून खरोखर आभारी आहे.
- पालक श्री सुभाष चव्हाण, पाटण
______________________________