अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य भेट व गुरुजनांचा केला सन्मान.
विंग|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
विंग ता. कराड येथील युवा उद्योजक व उपसरपंच सचिन पाचुपते यांनी वडील जगन्नाथ पाचुपते यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोळे येथील जिजाऊ वसतिगृहातील अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. तसेच पावसाळ्याच्या तोंडावर विद्यार्थ्यांची गरज ओळखून त्यांना छत्र्यांचे वाटप केले.

सचिन पाचुपते यांनी दातृत्वाचा वसा जपत समाजात वेगळा आदर्श निर्माण केला, तसेच वडिलांसमवेत ज्ञानदानाचे काम केलेले सेवानिवृत्त मनोहर लोहार, सर्जेराव माने, चंद्रभागा खबाले, ललिता पवार या शिक्षकांचा सन्मान केला.
या शिक्षकांना पुस्तकांची अनोखी भेट दिली. गोशाळेत जाऊन चारा वाटप केले. राष्ट्रीय कीर्तनकार चारूदत्त आफळे यांच्या कीर्तनाची संधी पंचक्रोशीतील हरीभक्तांना उपलब्ध केली.
यावेळी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते, पैलवान धनंजय पाटील, विलासराव पाटील येरवळेकर, प्रकाश पाटील सुपनेकर, अशोकराव पाटील पोतलेकर, नगरसेवक सुहास जगताप, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष सूरज शेवाळे, आदित्य मोहिते यांच्यासह विंग परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते.