श्री संतकृपा जुनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल 100 टक्के

घोगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा मार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेचा निकाल 21 मे रोजी दुपारी ऑनलाईन जाहीर झाला या मध्ये घोगाव येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या श्री संतकृपा ज्युनिअर कॉलेजने उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे.बारावी विज्ञान शाखेचा 100% टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत मोठे यश संपादन केले आहे. 

यामध्ये अक्षता लक्ष्मण वाठारकर हिचा प्रथम क्रमांक आला असून तिने 85.15% मिळवत घवघवीत यश संपादन केले तसेच सानिका शिवाजी थोरात हिने 85% मिळवत द्वितीय द्वितीय क्रमांक पटकावला, प्रणाली जगन्नाथ नांगरे हिने 84.33% मिळवत तृतीय क्रमांक पटकावला, तर तुषार बाळकृष्ण वाघमारे ह्याने 78.33 % मिळवत चतुर्थ क्रमांक पटकावला. आणि घराळ रितेश राजाराम 76.83 पाचवा क्रमांक मिळवला आहे.

महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवले आहे विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल श्री संतकृपा शिक्षण संकुलातील सर्व प्राचार्य, तसेच श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी , सेक्रेटरी प्रसून जोहरी, ट्रस्टी प्राजक्ता जोहरी , प्राचार्या पुष्पा पाटील आणि सर्वच मॅनेजमेंट टीमने अभिनंदन व कौतुक केले. या वेळी ज्युनिअर कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि सर्व शिक्षक वृंदांचे याबद्दल विशेष कौतुक व्यक्त करण्यात आले.