यात्रा म्हटले की दंडस्थान,नैवद्य,पालखी सोहळा, तमाशा,मातीतील कुस्ती आणि यात्रेनिमित्त बाकी सोपस्कार ओघाने आलेच पण आध्यात्मिक व भक्तीमय वातावरणात यात्रा साजरी करणारे गांव म्हणजे करपेवाडी (ता.पाटण) हे गाव आहे. संप्रदायाचा वारसा असणाऱ्या या गावांने गेल्या 51 वर्षापासून वरील काही परंपरांना फाटा देत श्रीज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याने यात्रा साजरी करण्याची परंपरा 52 वर्षा पासून जपलीआहे.
या वर्षी 52 व्या वर्षाच्या निमित्ताने 24 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान ज्ञानेश्वरी वाचन, प्रवचन, किर्तन, हरिपाठ,काकडा यांचे नियोजन पारायण मंडळ व यात्रा कमिटीने केले होते. 30 एप्रिल रोजी सायंकाळी श्रीमसनाईमाता मंदिरात महाआरती,श्रीमसनाई माता देवीचे मानकरी तानाजी करपे यांच्या अंगणात श्रीमसनाई देवीच्या पालखीतील देवीची आरती करून सासन काठ्यांसह वाजत गाजत,गुलालाची उधळण करत भाविकां चे मसनाईमाता मंदिराकडे प्रस्थान झाले.
मंदिर परिसरात पालखी स्थानापन्न झाल्यावर गावातून वाद्यांच्या गजरात सासन काठ्याचे मंदिर परिसरात दाखल झाल्या रात्री 9 वाजता ह.भ.प लक्ष्मण महाराज नलवडे (सर्जापूर) यांची किर्तन सेवन पार पडली.यात्रेच्या मुख्य दिवशी सकाळी देवीची आरती करून मंदिरातून श्री मसनाई देवी पालखी व सर्व सासन काठ्या,मानकरी,ग्रामस्थ व भाविक भक्तांसह श्रीभवानी माता मंदिराच्या दिशेने मार्गस्थ झाल्या,यावेळी ढोल ताश्या च्या गजरात छबिन्यात सामील सासन काठ्या तरुणांनी बेधूंद होऊन गुलालाची उधळण करत नाचण्याचा आनंद लुटला. पालखी मंदिर परिसरात विसावल्या नंतर नवसाचे दंडस्थान पार पडले सकाळी 9 ते 12 ह.भ.प.यशवंत महाराज कुंभारगांवकर यांचे काल्याचे किर्तन व नंतर महाप्रसाद पार पडला, श्रीज्ञानेश्वर पारायण सोहळा,व यात्रा धार्मिक पद्धतीने पार पाडण्यासाठी पारायण मंडळ, यात्रा कमेटी, ग्रामस्थ, तरुण युवक मंडळे,आणि परिसरातील भजनी मंडळे यांनी परिश्रम घेतले