कुंभारगांव बाजारतळावर मुख्य रस्त्या कड़ेला रस्त्यावरच जीव घेणे मोठे भगदाड पडले आहे. हे मोठे भगदाड वाहनचालका साठी धोकादायक बनले आहे. या रस्त्यावरून मानेगांव ते गलमेवाडी ते येवती मार्गे रयत कारखाना असा शॉर्टकट मार्ग असल्याने या मार्गावरून अनेक टू व्हिलर, फोरव्हीलर वाहनांची वर्दळ असते याच रस्त्यावर कुंभारगांव ता पाटण येथे बाजारतळावर आठवडा बाजार भरतो याच बाजार तळाच्या पूर्व बाजूला ग्रामदैवत श्री लक्ष्मी अंबाबाई देवीचे मंदिर असून या देवीच्या दर्शनासाठी याच मार्गावरून भाविक भक्ताची वर्दळ असते, तसेच या बाजार तळावर अंगणवाडी, प्राथमिक उपआरोग्य केंद्र असून या रस्त्या लगत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या बाजार तळावरील वर्दळी च्या रस्त्याच्या सेंटर पासून अवघ्या दहा फूट अंतरावर हे मोठे भगदाड पडले आहे अनेक दिवसापासून याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष्य होत असल्याचे दिसून येत आहे. एखादा मोठा अपघात होऊन दुर्घटना घडल्यानंतरच बांधकाम विभागाला जाग येणार आहे का? असा संतप्त सवाल वाहनचालक व कुंभारगाव येथील ग्रामस्थ विचारत आहेत.तातडीने या भगदाड पडलेल्या खड्ड्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी ग्रामस्थ व वाहन चालकातून होत आहे.
कुंभारगांव बाजारतळावर मुख्य रस्त्या कड़ेला पडले जीव घेणे भगदाड: वाहनचालक चिंतेत.