श्री संतकृपा अभियांत्रिकी महाविद्यालयात माजी विध्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न.


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
माजी विद्यार्थी मेळाव्यातून माजी विद्यार्थ्यांकडून आजी विद्यार्थ्यांना एक वेगळा आदर्श व प्रेरणा मिळत असते व त्यातूनच आजचे हे विद्यार्थी भविष्यातील भारताचे यशस्वी व आदर्श नागरिक घडत असतात असे प्रतिपादन श्री संतकृपा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी केले.

श्री संतकृपा अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकताच माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न झाला यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.

यावेळी पुढे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले महाविद्यालयातील अनेक माजी विद्यार्थी हे वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत काही विद्यार्थी यशस्वी उद्योजक आहेत हि महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे. हे महाविद्यालय व महाविद्यालयाचा परिसर विद्यार्थ्यांना प्रेरणा व ऊर्जा निर्माण करण्याचे काम करतो.या प्रेरणेतून त्यांना भविष्यातील करिअरची नवी दिशा मिळत असते. यामुळे माजी विद्यार्थी स्नेह मेळावा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असतो यातून माजी विद्यार्थ्यांचे अनुभव त्यांनी केलेले परिश्रम व परिश्रमातून जीवनात यशस्वी होणे हा संदेशच आजी विद्यार्थ्यांना मिळत असतो त्यामुळे माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याला खूप अनन्य साधारण महत्व आहे. या वेळी त्यांनी उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या वेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या माजी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक संतोष पतंगे यांनी केले व आपल्या प्रास्ताविकात त्यांनी माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यामागील भूमिका विशद केली.

या वेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यकत केले या वेळी बोलताना ते म्हणाले महाविद्यालयातील शिक्षकांमुळेच आज आम्ही जीवनात यशस्वी झालो आहोत. या वेळी त्यांनी शिक्षकांबद्दलची कृतज्ञताही व्यक्त केली. 

यावेळी माजी विद्यार्थी किरण चाळके,सुशांत पाटील,सुशांत माने,सागर सोनावणे,गणेश लुबाळ,शीतल सुतार यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनाचा मूलमंत्र दिला व आपल्या जीवनातील अनुभव शेअर केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय खाडे व प्राजक्ता शिर्के या विद्यार्थ्यांनी केले. माजी विद्यार्थी स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष शुभम शिंदे व सर्व सदस्य तसेच या कमिटीच्या प्रमुख प्राध्यापिका सीमा शिंदे व कमिटीतील सर्व सदस्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. 

या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर, सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्राध्यापिका भाग्यश्री पाटील यांनी आभार व् मानले.