स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोषिकाने कु.सानिका पाटील सन्मानित.
तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
न्यू इंग्लिश स्कूल काळगांव येथे इ.10 वी त मुलींमध्ये प्रथम आलेल्या कु.सानिका सुरेश पाटील हिचा स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोषिक, रोख रक्क्म रु.1,000/-, सन्मानपत्र आणि ‘तात्या’ हे पुस्तक देवून गौरव करण्यात आला. याप्रसंगी डाॅ.संदीप डाकवे, कु.सानिकाचे वडील सुरेश पाटील, अरुण संतू पाटील, विराज पाटील उपस्थित होते. कु.सानिका ही आता तासगांव येथील शासकीय महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरींगच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. आजोबांच्या नावाने पारितोषिक देवून चिमुकल्या सांचीने त्यांची आठवण जपली आहे.

 न्यू इंग्लिश स्कूल काळगाव शाळेत इ.10 वीत मुलींमध्ये प्रथम येणाऱ्या मुलींसाठी पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील चिमुकली सांची रेश्मा संदीप डाकवे हिच्या नावे ठेवपावती ठेवण्यात आली आहे. या ठेवपावतीच्या व्याजातून प्रतिवर्षी एका मुलीला स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोषिक दिले जाणार आहे. सांचीच्या प्रथम वाढदिवसानिमित्त डाकवे परिवाराने हा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

यापूर्वी डाकवे परिवाराने शैक्षणिक चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी ज्ञानाची शिदोरी, माणुसकीच्या वहया, एक वही एक पेन, गणवेश वाटप, शाळेला तक्ते वितरण, विनामुल्य बोलक्या भिंती, महापुरुषांच्या प्रतिमांचे वितरण, गुणवंत विद्यार्थ्यांचा घरी जावून सत्कार, स्वाध्यायमाला वितरण, दिव्यांग मुलांना चित्रकला साहित्य वाटप, इ.राबवेल आहेत. तसेच इ. स्पर्धा राबवल्या आहेत.

यापूर्वी सांचीच्या बारशानिमित्त विविध क्षेत्रातील 13 महिलांचा नारी रत्न पुरस्कार, बोरन्हाण समारंभाला ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ चा संदेश देत महिलांना प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप, कॅलिग्राफीतून अक्षरसंस्कार, पुस्तकांचे झाड इ.उपक्रम राबवले आहेत.

------------------------------------------------------

  मुलींना शिक्षणासाठी प्रेरणा मिळावी हा उद्देश : डाॅ.संदीप डाकवे

ग्रामीण भागत आजही इ.10 वी नंतर मुलींचे शिक्षण बंद होत आहे. हुशार आणि होतकरु मुलींना परिस्थितीमुळे अर्धवट शिक्षण सोडावे लागत आहे. अशा मुलींना स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोषिकाने प्रेरणा मिळेल हा उदेदश हा उपक्रम राबवण्यामागे असल्याचे मत सांचीचे वडील शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे यांनी व्यक्त केले.

-------------------------------------------------------