कुंभारगाव विभागाला वादळी वाऱ्याचा तडाखा

 वादळी वाऱ्यामुळे घरावर विजेच्या खांबासह झाड ही कोसळले.


कळंत्रेवाडी येथे राहत्या घरावर पडलेले किणीचे झाड.

कुंभारगाव| कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

 गेल्या आठवडाभरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, विजाच्या कडकडाटात

दररोज दुपारनंतर वादळी पाऊस हजेरी लावत विभागात दमदार पाऊस कोसळत असला तरी या उन्हाळी अवकाळीने ढेबेवाडी विभागात अक्षरशः धुमाकूळ घातला असून जनतेची लाखो रूपयांची हानी झाली आहे.काल दुपारीही विजांच्या कडकडात पडलेल्या वळीवाने कुंभारगांव विभागात पुन्हा धुमाकूळ घातल्याने विज वितरणतचे खांब मोडून व वाकून तरा तुटून मोठे नुकसान झालेच पण कळंत्रे वाडी येथे घरावर झाड पडून नुकसान झाले त रात्रभर ढेबेवाडी विभाग अंधारात बुडून गेला.


काल दुपारी अचानक सोसाट्याचा वारा सुरु झाला, वाऱ्याचा वेग प्रचंड होता की विभागातील वायचळवाडी येथे विज पुरवठ्याचे दोन खांब मोडून पडले विज पुरवठा बंद असल्याने मोठा अनर्थ टळला तर कळंत्रेवाडी येथील कुसुम आचरे यांच्या राहत्या घरावर भले मोठे किणीचे झाड पडून घराचे नुकसान झाले आहे त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून सदर घर मिळाले होते, घरात यावेळी कोणी नसल्याने जिवीत हानी टळली यादरम्यान विज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटना स्थळी धाव घेत वायचळवाडी येथील दोन खांबावरील विज पुरवठा बंद केल्याने अनर्थ टळला. रात्री उशिरा विधुत पुरवठा चालू केला पण रात्री नऊनंतर विजेचा कडकडाट पावसाने पुन्हा हाजेरी लावली तेव्हा विजपुरवठाही पुन्हा बंद पडला व संपूर्ण विभाग अंधारात गेला.