ढेबेवाडी, कुंभारगाव विभागाला वादळी पावसाचा तडाखा

 घरे, शाळा, वाहने, विजेचे खांब यांचे नुकसान, झाडे उन्मळून पडली,ओढे तुडुंब भरून वाहू लागले.

ढेबेवाडी| कृष्णाकाठ वृत्तसेवा: on 

          ढेबेवाडी परिसरात मंद्रुळकोळे खुर्द, साबळेवाडी, मंद्रुळकोळे, मालदन, सुतारवाडी मान्याचीवाडी व ढेबेवाडी बाजारपेठ तसेच भरेवाडी काळगाव तसेच कुंभारगांव विभागातील कुंभारगांव,गलमेवाडी, चाळकेवाडी,मानेगांव ,काढणे, बागलवाडी येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली यामध्ये काही ठिकाणी घरांचे पत्रे उडून, झाडे पडून, लाईटच्या तारा तुटून नुकसानीच्या घटना घडल्या आहेत 

     काल शुक्रवार दिनांक 10 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ढेबेवाडी परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पाऊस सुरू झाला यामुळे मालदन येथे रस्त्याच्या कडेला तारा तुटल्या यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता तर मालदन मार्गे पाटणला जाणाऱ्या रस्त्यावर बाभळीच्या झाडाची फांदी पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता, ढेबेवाडी कराड रस्त्यावर संगम पुलाच्या पुढे रस्त्यावर झाड पडल्याने एक मार्गाने वाहतूक सुरू होती तर साबळेवाडी येथे दत्तात्रय भीमराव साबळे यांनी आपल्या घराच्या पुढे लावलेल्या चारचाकी गाडीवर दारातील झाड पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. मंद्रूळकोळे खुर्द येथील रुपेश बबनराव भोई यांच्या घरावरील तसेच दादासाहेब साळुंखे यांचे शेडवरील पत्रा उडून जावून नुकसान झाले भरेवाडी काळगाव येथे विकास विष्णू बावडेकर यांच्या राहत्या घरावरील छप्पर उडून मोठे नुकसान झाले आहे.

घरे, शाळा, वाहने, विजेचे खांब यांचे नुकसान, झाडे उमळून पडली,ओढे तुडुंब भरून वाहू लागलेर गलमेवाडी येथील दोन घराचे कौले, पत्रे उडून गेले तर बोरगेवाडी येथील घरावरचे पत्रे, मानेगांव येथील प्राथमिक शाळेचे पत्रे,मानेगांव ते कुंभारगांव रस्त्यावरील खोलवडा येथील अधिक माने यांचे घराचे रस्त्याच्या कडेला असणारे झाड विधुत पुरवठा करणाऱ्या लाईन वरून रस्त्यावर पडल्याने व विधुत खांब वाकल्याने हा मार्ग दोन तास बंद झाला होता. मानेगांव येथील ग्रामस्थ यांनी अथक प्रयत्न करून कटरच्या साह्याने पडलेले झाड कट करून मार्ग मोकळा केला तसेच काढणे येथील बागलवाडी येथेही अनेक झाडे वादळी वाऱ्याने जमीन दोस्त केली आहेत. तळमावले येथील शिवाजी मॉल चे काचेचे स्लायडिंगचे वादळी वाऱ्याने नुकसान केले आहे. या वादळी वाऱ्याने व पाऊसाने कुंभारगांव तळमावले, काढणे परिसर झोडपून काढला या वेळी कुंभारगांव विभागातील गलमेवाडी येथे पाऊसाने जोरदार बॅटिंग केल्याने ओढे, नाले पाण्याने ओसंडून वाहू लागले