बाईक वर बसून रॅली चे नेतृत्व करताना पाटण चे सहा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे व गट विकास अधिकारी गोरख शेलार .
पाटण|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
पाटण मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनातर्फे काल भव्य रॅली काढून विभागात जनजागृती करण्यात आली. कितीही कडक उन्हाळा असला तरी किंवा घरापासून उदरनिर्वाहासाठी मुंबई पुणे येथे कामानिमित्त असलेले मतदार 7 मे ला ज्यांची नावे मतदार यादीत आहे त्या सर्वांनी मतदानासाठी अवश्य वेळ काढावा व लोकशाही मजबूत करण्यासाठी आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन पाटण चे सहा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे यांनी केले आहे.
याशिवाय मतदान करताना निर्भयपणे मतदान करावे कुठल्याही आमिषाला अथवा प्रलोभनाला बळी पडू नये असेही आवाहनही मतदारांना करण्यात आले.
या रॅलीचे यशस्वी आयोजन करण्याकरिता गट विकास अधिकारी गोरख शेलार स्वीप चे समन्वय अधिकारी राजश्री बने तसेच तहसीलदार अनंत गुरव यांनी परिश्रम घेतले.
सदर ची रॅली ही पाटण, नेराळे,सुळेवडी, गव्हाण वाडी, नवा रस्ता, परत पाटण शहर अशा मार्गाने काढण्यात आली. सदर रॅलीत तलाठी, ग्रामसेवक,अंगणवाडी सेविका, कर्मचारी आदी सहभागी झाले होते.या रॅली ला पंचायत समिती कार्यालय समोर हिरवा झेंडा दाखवून प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी या रॅली चे नेतृत्व केले. गट विकास अधिकारी यांचे समवेत बाईक वर बसून सदर रॅलीत सहभाग देखील नोंदविला.