कुंभारगांव येथे शेतातील झाडावर पडली वीज.


कुंभारगांव| कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
कुंभारगांव ता पाटण येथे आज सायंकाळी साधारण ४:०० वाजण्याचे सुमारास अवकाळी पाऊसाने कमी प्रमाणात हजेरी लावत असतानाच विजेचा कडकडाट झाला अन हि वीज कुंभारगांव येथील बागल वस्ती नजीक चांभारकी शिवारातील शाम कुलकर्णी यांचे शेतातील नारळाचे व जांभूळ या झाडावर पडली यावेळी शिवारात कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला या विजेने नारळाच्या झाडाची पाने जळून गेली असून जांभळाच्या झाडाला उभी लाबंच भेग पडली असून नारळाच्या झाडाला मोठे क्रश पडले आहेत.