राष्ट्रनिर्मिती मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचे मोठे योगदान : सचिन पुजारी

 

तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान,संचलित स्व. दादासाहेब मोकाशी कृषी व अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय राजमाची ता कराड यांचा राष्ट्रीय सेवा योजनेचा विशेष श्रमसंस्कार शिबिराचे १ एप्रिल ते ५ एप्रिल २०२४ अखेर मौजे बनपुरी ता पाटण या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे काकासाहेब चव्हाण कॉलेज तळमावले (ज्युनियर विभाग ) प्रा सचिन पुजारी व्यासपीठावर प्रा, दुर्गवळे पी, पी, दळवी डी, एस, निकम एस, एस, बागल पी, डी, चव्हाण एस, एस, बर्गे एन, डी, क्षीरसागर डी, एम, लोंढे सर, उपस्थित होते.या वेळी व्यासपिठावरून उपस्थित विध्यार्त्याना मार्गदर्शन करताना प्रा सचिन पुजारी सर बोलत होते की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवेबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला गेला आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त म्हणजेच सन १९६९ साला पासुन राष्ट्रीय सेवा योजना सुरू करण्यात आली सेवा हाच धर्म मानुन शेवट पर्यंत प्रामाणिक प्रयत्न केला आहे त्यामुळे अशा या.से.यो.शिबीरातुन विद्यार्थ्यांना श्रमसंस्कारांचे धडे दिले जातात आणि विद्यार्थ्यांमध्ये जीवनाच्या वास्तवतेची सकारात्मक जाणिव निर्माण करुन आपलं आयुष्य समृद्ध करण्यासाठी अशा श्रमसंस्कार शिबीरांची गरज असते.तसेच विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रेरणादायी व स्फुर्ती गीतातुन श्रमसंस्कार शिबिर का आपल्या आयुष्यात महत्त्वाचे आहे हे सांगितले त्यामध्ये - खरा तो एकची धर्म, हम होंगे कामयाब ,आता उठवु सारे रानं, धरण, युगायुगाची गुलामी चाल इ.गाणी घेऊन संदर्भासहित स्पष्टीकरण केले विद्यार्थ्यांना देखील समाविष्ठ करून या शिबीराचे ३ रे पुष्प मार्गदर्शनात्मक व मनोरंजनात्मक हा कार्यक्रम यशस्वी रीत्या संपन्न झाला. 

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा चव्हाण एस, एस मॅडम यांनी केले तर आभार प्रा दळवी डी, एस, सरांनी केले कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी, स्वयंसेवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.