तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा:
महाराष्ट्रावर परिणाम करणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तींचे व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन कै रामराव निकम शिक्षणशास्त्र महाविद्यालय इंदोली ता कराड येथील बीएड द्वितीय वर्ष छात्राध्यापिका प्रियांका दिपक गुरव यांनी कुसुर ता. कराड या ठिकाणी ग्रामस्थ, महिला वर्ग यांना मार्गदर्शन पर जनजागृती करताना वैयक्तिक समाजाभिमुख प्रकल्पांतर्गत कुसुर ता.कराड येथे महाराष्ट्रावर परिणाम करणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्ती उदा.पूर, चक्रीवादळ, भूकंप, दुष्काळ याविषयी सखोल मार्गदर्शन करताना बोलत होत्या की चक्रीवादळे तीव्र व चक्रकार असतात ही वादळे उष्णकटिबंधीय वादळे आहेत.महासागरामध्ये ही वादळे प्रामुख्याने आढळतात बंगालच्या उपसागरात ही चक्रीवादळे आढळतात. ही वादळे कमी दाबाच्या पट्ट्याभोवती फिरतात उष्णकटिबंधीय वादळामध्ये चक्राकार वारे वाहतात.जोरदार पावसामुळे महापूर येतात. वारे 120 कि.मी.पेक्षाही जास्त वेगाने वाहू लागतात.अरबी समुद्रात 1890 ते 1995 या कालावधीत 207 वादळांच्या घटनांपैकी 19 घटनांचा महाराष्ट्र गोवा प्रतिबंधीय भागावर परिणाम झाला होता. बहुतेक वादळे महाराष्ट्रातून निघून गेले.70 मृत्यूमुखी पडले. 160 खलाशी बेपत्ता झाले. 150 बोटी बेपत्त्या झाल्या. वृक्ष जहाजांचे मोठे प्रमाण नुकसान झाले.
पूर प्राचीन काळापासून भारतात उद्भवणारी आपत्ती आहे. दरवर्षी महाराष्ट्राच्या काही भागात तीव्र पूर येतात. काही भागात पुरामुळे फार मोठ्या प्रमाणात हानी होते. तर काही भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. जून ते सप्टेंबर कालावधीत पाऊसाचे प्रमाण जास्त असते. पुराचे तीन प्रकार आहेत अचानक आलेला पूर, नदीचे पूर, समुद्रकिनाऱ्यावरील पूर. पावसाळ्यात बालके, वृद्ध, महिला, अपंग यांना त्रास होणार नाही यांची काळजी घेणे.वैद्यकीय सेवा औषधे यांची व्यवस्था करणे.
यावेळी कुसुर येथील प्रतिष्ठित ग्रामस्थ हनमंत मोहनराव मोरे यांनी आपले मत व्यक्त केले. त्यातून आपत्तींची माहिती सांगितली व त्यावर उपाय सुचविले.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत सरपंच, सदस्य दिलीप मोरे व इतर सदस्य, ग्रामस्थ,महिला व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. तसेच सौ. सुनंदा पाटील,श्रेया कराळे, वेदांत पुजारी यांनी आपला अभिप्राय व्यक्त केला.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य पाटील सर, मार्गदर्शक सौ.थोरात मॅडम, सौ.बोर्डे मॅडम,अजय बोतलजी सर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.