कराड ढेबेवाडी रोडवर मानेगांव नजीक कारचा भीषण अपघात एक ठार, तीन जखमी.

मानेगाव जवळील कुंभारगांव फाटा होतोय अपघाताचा हॉटस्पॉट.   

 ढेबेवाडी कराड रोडवरील मानेगाव कुंभारगांव फाटा नजीक घडलेली घटना.            

तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा: मानेगाव तालुका पाटण येथील रहिवाशी मारुती तुकाराम माने वय ४७ वर्षे ,मुलगा ओंकार मारुती माने वय २४ वर्षे, दाजी दिनकर पिलाजी वाघ वय ६३ वर्षे, मावस भाऊ दिनकर शिवराम हावळे वय ४५ वर्षे ,बोअर मशीनवरील कामगार अरविंद बापुराव थोरात व गावातील मारुती दत्तात्रय माने, सुनिल मारुती मोरे व पांडुरंग धोंडीराम पिसाळ हे सर्वजण काल शुक्रवार दिनांक २६/०४/२०२४ रोजी शेतातील पाईपलाईनचे काम सुरू असल्याने तळमावले ते कराड जाणारे डांबरी रस्त्यालगत कुंभारगाव फाटा येथे रस्त्याचे खाली आडवी बोअर मारुन त्यामधुन पाईपलाईन पलीकडे घेवून जाण्याचे काम करत होते. 

यावेळी रात्री ९:३० च्या सुमारास तळमावले बाजुकडुन एक चारचाकी टाटा टिगॊर कार MH.50.U 2794 सुसाट वेगात या काम करत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या दिशेने आली व त्याने रस्त्याचे कडेला साईटपटटीवर लावलेली मोटारसायकल उडवुन तसाच पुढे रस्त्याचे खाली येवुन पाईपलाईनचे कामावर असलेले ओंकार मारुती माने, दिनकर पिलाजी वाघ, दिनकर शिवराम हावळे व बोअर मशीनवरील कामगार अरविंद बापुराव थोरात यांना उडवुन तसाच पुन्हा वेगात पुढे जावुन रस्त्याचे कडेला असलेल्या खडयात गाडी गेल्याने गाडी तेथेच बंद पडली व त्यानंतर त्या चारचाकी गाडीतील चालक गाडीतुन खाली उत्तरला तेव्हा प्रसंगावधान राखत मारुती तुकाराम माने त्याचेजवळ गेले तर या कारचा चालक अमीर मेहबूब पटेल रा पाडळी केसे ता कराड हा दारूच्या नशेत तूर दिसून आला व त्याला घटनेची जाणीव होताच तो शेताकडे पळून गेला त्यानंतर मारुती माने यांनी त्यांचा धाकटा मुलगा अभिषेक याला फोन करुन अपघात झाल्याची माहिती मोबाईल वरून दिली थोडयाच वेळात गावातील लोक मदतीसाठी घटनास्थळी धावून आले व या अपघातातील जखमींना ग्रामस्थांनी तातडीने रुग्णवाहिकेने कृष्णा हॉस्पिटल कराड येथे दाखल केले. या अपघातातील जखमी ओंकार मारुती माने, दिनकर पिलाजी वाघ ,बोअर कामगार अरविंद थोरात यांचेवर कृष्णा हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. तर दिनकर हावळे यांचेवर एरम हॉस्पिटल कराड येथे उपचार सुरू आहेत या अपघातातील एक जखमीं दिनकर पिलाजी वाघ यांचेवर कृष्णा हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु असताना रात्री 1 :00 वाजता त्यांचे दुर्दैवाने दुःखद निधन झाले. आज दुपारी त्यांचेवर मानेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले असून या‌ घटनेने मानेगाव मध्ये शोककळा पसरली आहे.या अपघाताची फिर्याद मारुती तुकाराम माने यांनी ढेबेवाडी पोलीस स्टेशनला दिली.

 या अपघाताचा तपास ढेबेवाडी पोलीस स्टेशनच्या साहाय्यक पोलीस निरीक्षक शैलजा पाटील यांचे मार्गदर्शनाखाली प्रशांत चव्हाण करीत आहेत.

ढेबेवाडी कराड रोडवरील मानेगाव कुंभारगांव फाटा अपघाताचा हॉटस्पॉट होत आहे यापूर्वी येथे अनेक अपघात झाले आहेत व त्यात काही निरपराध लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. शासनाने या स्पॉटची तपासणी करून योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी वाहनधारक व ग्रामस्थांतून होत आहे.