निवडणूक निरीक्षक (खर्च) कुमार उदय यांची पाटण ला भेट


पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
सातारा लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू असून एकूण 16 उमेदवार रिंगणात आहेत विविध राजकीय पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार सुरू झाल्याने यासाठी होणाऱ्या खर्चाबाबत ची पडताळणी व तपासणी करण्यासाठी सातारा लोकसभा मतदार संघासाठी कुमार उदय (IRS) यांची निवडणूक आयोगामार्फत नियुक्ती झाली असून त्यांनी नुकतीच पाटण विधानसभा मतदारसंघात भेट देऊन याबाबतचा आढावा घेतला पाटण मतदार संघात दळण वळणाच्या दृष्टीने महत्वाच्या महामार्गावर 4 ठिकाणी स्थिर निगराणी पथक नियुक्त असून निसरे फाटा येथील स्थिर निगराणी पथकास त्यांनी भेट देऊन काही सूचना केल्या तसेच त्यानंतर पाटण येथील सुरक्षा गृहाची पाहणी केली.तसेच पाटण मतदारसंघात कार्यरत एक खिडकी पथक, VST पथक,VVT पथक, FST पथक,Accounting Team,यांचेशी चर्चा करून त्यांचे वतीने सुरू असलेल्या कामाची पाहणी करून याबाबत काही सूचना संबंधित पथक प्रमुख यांना केल्या पाटण तालुक्यात स्वीप उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या मतदान जन जागृती बाबत व पाटण तालुक्याचे वैशिष्ट्य असलेले कोयना धरण व सह्याद्री व्याघ प्रकल्प ची थिम मतदान जनजागृती साठी घेतले बाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. यासंदर्भात स्वाक्षरी अभियान चां शुभारंभ देखील निवडणूक खर्च निरीक्षक कुमार उदय यांचे हस्ते करण्यात आला. 

लोकसभेसाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला 95 लक्ष रुपयाची खर्चाची मर्यादा आहे. त्यामुळे उमेदवाराने निवडणूक प्रक्रियेदरम्यान केलेला एकूण खर्च हा या मर्यादेत असणे अपेक्षित असल्याचे त्यांनी भेटीदरम्यान स्पष्ट केले आहे.

निवडणूक खर्च निरीक्षक कुमार उदय यांनी पाटण तालुक्यातील चिपळूणच्या सीमेलगत लागून असलेल्या कोयनानगर परिसरात व नवजा सारख्या दुर्गम भागात देखील पाहणी केली एकंदरीत पाटण मतदारसंघातील सुरू असलेल्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले असून यापुढील काळात प्रचारादरम्यान होणाऱ्या खर्चाच्या बाबत अधिक दक्ष राहण्याच्या सुचानादेखील त्यांनी संबंधित पथकांना केल्या आहेत याप्रसंगी त्यांचे समवेत पाटण चे सहा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे व इतर अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.