कुंभारगांव|कृष्णाकाठ वृत्तसेवा: कुंभारगांव ता पाटण येथील बाजारतळ मंदिर परिसरात वड, पिंपळ वृक्षाची मोठी झाडे असून या झाडावर अनेक आग्या मध माश्याचे पोळे आहेत आजपर्यंत कधीही मध माश्या सैरभैर झाल्या नव्हत्या परंतु शनिवारी दुपारी लग्न समारंभा निमित्ताने बाजारतळावर डीजे चालू झाला व अचानक आग्यामोहाच्या मधमाश्या सैरभैर झाल्या आणि मंदिर परिसर, बाजारतळ, ग्रामपंचायत परिसरात असणाऱ्या नागरिकांच्यावर हल्ला चढवला या वेळी मोटर सायकल वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर ही हल्ला केला यावेळी गवताच्या पेढ्याचा जाळ करून अनेक नागरिकांना वाचवण्याचा प्रयत्न युवक वर्गांनी केला तर काहींना नागरिकांना तळमावले येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर काहींना कराड रुग्णालयात दाखल केले आहे या मधमाश्याच्या हल्ल्याने परिसरात दहशत निर्माण झाली असून शनिवारी व रविवारी मधमाश्याच्या भीतीने बाजारतळ परिसरात शुकशुकाट होता.
कुंभारगांवात आग्यामोहाच्या मधमाश्यांचा अनेक ग्रामस्थांवर हल्ला