आज एका वेगळ्या विषयावर, हा लेख लिहीत आहे. आत्मविश्वास असावा पण अति आत्मविश्वास नसावा हेच ह्या लेखंतावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. " टायटॅनिक - एक न बुडणारे जहाज. " आपण सर्वांनी टायटॅनिक सिनेमा पहिला असेल, त्यातील रॉस , जॅक डॉसन आणि त्यांची प्रेमकथा, तिथले रईस जिंदगी जगणारे लोक, उच्च वर्णीय राहणीमान आणि अर्धा ते पाऊन तासात बुडणारे जहाज, त्या लोकांची जगण्याची धडपड आणि हजारो मृतदेह हे सर्व पहिले, पण टायटॅनिक हा अपघात होता ह्याबद्दल शंका नाही मात्र तुम्ही म्हणाल इथे अति आत्मविश्वास कुठे येतो ? ह्यासाठी आपण जाऊयात ११७ वर्ष पाठीमागे !!!
टायटॅनिक या जहाज च नाव आहे RMS टायटॅनिक, हे जहाज White Star Line ह्या कंपनीने १९०७ मध्ये बनवायला सुरवात केली, हे जहाज बनवणारे मुख्य इंजिनिअर होते थॉमस अँड्र्यू. सुरवातीपासूनच हे ध्येय ठेवून हे जहाज बनवण्यात आले कि, RMS टायटॅनिक हे जगातील सर्वात आलिशान, अनसिंकेबल (न बुडणारे ), सर्वात वेगवान जहाज त्या कंपनीने १९१२ च्या सुरवातीला पूर्ण केले. ह्या जहाज मध्ये फर्स्ट क्लास ग्रँड स्टेर केस, जिम्नॅशिअम, पंचतारांकित हॉटेल अँड रेस्टॉरंट्स, वर्ल्ड क्लास लायब्ररी, फर्स्ट क्लास टर्किश बाथ, लोकांसाठी राहण्यासाठी फर्स्ट क्लास लग्झरिअस रूम्स, आणि सेकंड क्लास रूम्स , अशा या २७० मिटर लांब, ५७ मिटर रुंद आणि ५३ मिटर उंच जहाजामध्ये एकूण २५०० लोकांची क्षमता होती. हे बनवण्यासाठी त्या काळी ७.५ मिलियन डॉलर इतका खर्च आला होता. आजचे रुपयांमध्ये बोलायचे झाले तर ३ हजार करोड रुपये. त्याची RMS TITANIC - THE UNSINKABLE ह्या टॅगलाईन खाली जगात जाहिरात करण्यात आली. जगातील जास्त करून युरोप मधील उच्च वर्गीय लोक ह्या जहाजाची लौंचिंग ची वाट पाहत होते. लोकांचा वाढत प्रतिसाद पाहता कंपनीने मार्च १९१२ मध्ये पहिला प्रवास यात्रा फायनल केली. हा प्रवास होता अटलांटिक महासागरातून साऊथ हॅमटन ते लंडन हा प्रवास साधारण ५२०० किमी चा हा प्रवास कंपनीच्या म्हणण्यानुसार ६ दिवसात पूर्ण करायचा होता. तसा विश्वास कंपनीने लोकांना दिला होता.
ह्यासाठी कॅप्टन म्हणून ६२ वर्षीय अनुभवी एडवर्ड स्मिथ यांची निवड करण्यात आली. RMS टायटॅनिक चा प्रवास दि. १० एप्रिल १९१२ रोजी सुरु झाला. अनेक उच्चभ्रू लोक ह्या जहाज मधून प्रवास करत होते.
White Star Line कंपनी कडून कॅप्टन एडवर्ड स्मिथ याना ऑर्डर होती, जहाज च स्पीड ४० किमी प्रति तासाच्या खाली आले नाही पाहिजे. कारण कंपनीला दाखवून द्याचे होते जगातील सर्वात वेगवान जहाज हे RMS टायटॅनिक हे आहे. १३ एप्रिल मध्यरात्रीनंतर हिमखंडाचे ( Iceberg) संदेश इतर प्रवासी जहाजांकडून RMS टायटॅनिक ला मिळत होते, नियमानुसार एखाद्या जहाजाला हिमखंड दिसत असेल तर त्यांनी आपल्या आजूबाजूला जे जहाज असतील त्यांना हा संदेश देणे बंधनकारक आहे, RMS टायटॅनिक ला एकूण १३ संदेश प्राप्त झाले, मात्र RMS टायटॅनिक हे चालूच राहिले, कारण हे जहाज न बुडणारे आहे, हा विश्वास कॅप्टन सह सर्व मॅनेजमेंट ला होता. त्यांनी आपले स्पीड कमी केले नाही. RMS टायटॅनिक अनेक हिमखंड चुकविण्यात यशस्वी सुद्धा ठरले.
जहाज वरती एक लूक आऊट पॉईंट ठेवण्यात येतो तिथे २-३ गार्ड दिवसरात्र पहारा देत असतात त्यांचे काम एकच असते, जहाजाच्या मार्गात येणारे अडथळे , हवामान याबद्दल माहिती कॅप्टन आणि इतर स्टाफ यांचे पर्यंत पोहचवणे. १४ एप्रिल च्या रात्री चन्द्र न आल्यामुळे संपूर्ण काळोख होता, गार्डस ना व्हिसिब्लिटी प्रॉपर नव्हती ,अटलांटिक महासागरात तापमान हे मायनस दोन (-२) डिग्री से. असल्यामुळे त्या गार्ड याना वरती पहारा देणे आणि रात्री अंधार खूप असल्यामुळे खूप कमी समोर दिसत होते. १४ एप्रिल १९१४ रात्री ११. ३० वाजता त्यांना एक मोठा साधारण ४०००० चौ. फूट चा हिमनग दिसला. परंतु ह्या हिमनगाचे आणि जहाज मधील अंतर फक्त २०० मि. होते म्हणजे इतक्या कमी अंतरामध्ये ह्या स्पीड ला टर्न मारणे, खूप अवघड गोष्ट होती. हा हिमनग दिसताच त्यांनी ३ वेळा बेल वाजवली, आणि टेलेफोन केला रिंग केली.खाली सर्वत्र पळापळ झाली कॅप्टन च्या ऑर्डर प्रमाणे डावीकडे वळवण्यात आल, मात्र ऑपरेटर रॉबर्ट हिचेन्स कडून त्या गडबडीत चूक झाली त्याने घाबरून स्टेरिंग डावीकडे वळवण्याऐवजी उजवीकडे वळवले, कॅप्टन च्या लक्षात येताच कॅप्टन स्मिथ यांनी पळत स्टेरिंग वरती जाऊन परत ते डावीकडे वळवले मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. जहाज हिमनगाच्या अधिककच जवळ गेले . जहाजाची उजवी बाजू हिमनगाला जवळ जवळ ३० सेकंद घासत गेली. हि घटना रात्री ११.४० च्या दरम्यान घडली. जेव्हा हे जहाज हिमनगाला घासले तेव्हा खूप मोठा आवाज आला काहीतरी तुटल्याचा पण तोपर्यंत सर्व प्रवासी याना वाटत होते, काही प्रॉब्लेम नाही , एखाद्या हिमनगाला घासले असेल, हे जहाज सुरक्षित आहे, ह्याला काही होणार नाही.
समोरचा जो भाग आहे त्याला बोव म्हटले जाते त्याला १३ लेयर होत्या, समोर सर्व कम्पार्टंमेंट ला ट्रिपल लेयर असल्याकारणाने जरी ४ कंपार्टमेंट पाण्याने भरले तरीही हे जहाज बुडू शकणार नाही. परंतु जहाजाच्या बाजूने आघात झाल्यामुळे एका वेळी ८-९ कंपार्टमेंट मध्ये पाणी भरायला सुरवात झाली, मुख्य इंजिनिअर थॉमस अँड्र्यू यांनी ओळखले कि आता हे जहाज बुडणार आहे.
हा अंदाज त्यांना साधारण रात्री ११.५५ वाजता आला, कारण समोर अनेक सुरक्षित लेयर्स असल्या तरी जहाजच्या बाजूने मात्र इतके सुरक्षित नव्हते त्यामुळे एका वेळी ७ ते ८ कंपार्टमेन्ट मध्ये पाणी भरले, त्यांचा नुसार जर ४ कंपार्टमेन्ट भरले असते तर काही प्रॉब्लेम झाला नसता, हे जहाज बुडणार एवढंच त्यांना वाटले.
कॅप्टन एडवर्ड स्मिथ यांनी रेडिओ ऑपरेटर ला आदेश दिले, जवळ असलेल्या सर्व जहाज याना रेडिओ द्वारे वाचवण्यासाठी मदत मागा, परंतु एवढ्या रात्री त्यांना रिस्पॉन्स कुठून हि मिळत नव्हते. रात्रीचे १२.१० मि. नंतर सर्व कंपार्टमेंट भरले, जहाजाचे वजन एका बाजूला वाढल्यामुळे जहाज एका बाजूने खाली झुकू लागले, मदतीसाठी हवेत जवळ जवळ ७०० फटाके आणि रॉकेट्स फोडण्यात आले. मात्र जवळ कोणत्याही जहाजाकडून मदतीसाठी रिप्लाय आला नाही. कॅप्टन आणि इंजिनिअर यांचा अंदाजानुसार जहाज बुडायला १ तास ते सव्वा तास बाकी होता. मध्यरात्री १.२० मिन नंतर ब्रिटिश शिप RMS कारपथीय चा संदेश आला आम्ही मदतीसाठी येत आहोत. मात्र हे जहाज टायटॅनिक पासून ११० किमी लांब होते आणि त्यांचा उच्च स्पीड ने जरी ते आले तरी त्यांना 3-4 तास लागणार होते. त्यांनी आपला मार्ग बदलून ते टायटॅनिक कडे मदतीसाठी वळले.
कॅप्टन स्मिथ नि परिस्थिती ओळखून ऑर्डर दिली सेफ्टी बोट ने पॅसेंजर उतरा म्हणून. २५०० लोकांची कॅपसीटी असलेल्या जहाजमध्ये फक्त २० सेफ्टी बोट होत्या , करण व्हाईट स्टार कंपनीला वाटले हे तर जहाज बुडणार नाही सेफ्टी बोट ची काय गरज ?
२० बोट मधून मॅक्सिमम १०००-१२०० लोक वाचणार होते. पहिल्या ३ बोटीमध्ये फक्त ५०% प्रवासी भरून अर्ध्या बोटी खाली घालवण्यात आल्या. प्रवासी प्रचंड घाबरले होते, प्रोटोकॉल नुसार महिला आणि लहान मुले याना प्राधान्य देण्यात आले . जहाज स्टाफ आणि प्रवासी यांच्यात प्रचंड राडा झाला. नाईलाजाने पोलिस ऑफिसर ने हवेत गोळीबार केले, २-३ अरेरावी करणाऱ्या पॅसेंजर्स ना गोळ्या घातल्या. जो तो मदतीसाठी, जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता. आय विटनेस नुसार शेवटची सेफ्टी बोट १.३० वाजता उतरण्यात आली . RMS कारपथीय बोट येण्यासाठी पहाटे ३.३० वाजले सेफ्टी बोट मधील लोक वाचवण्यात ते यशस्वी झाले.
मात्र हे सुद्धा खर आहे टायटॅनिक पासून फक्त ३५-४० किमी वर एक जहाज होते. त्याच नाव होते SS कॅलिफोर्निया , मात्र त्यांचा रेडिओ ऑपरेटर ने सिग्नल बंद केले होते आणि त्यांचा लूक आऊट गार्ड ने हवेतील फटाके आणि रॉकेट्स पाहिले आणि त्यांनी आपल्या कॅप्टन स्टॅनली लॉर्ड याना सांगितले मात्र कॅप्टन याना हे रईस लोक आहेत हे रोज च फटाके वाजवत आहेत. आणि ते सुद्धा खर होत, टायटॅनिक ची रॉयल फॅमिली रोज पार्टी करून क्रूझ वर हवाई फटाके उडवत होती. त्यामुळे SS कॅलिफोर्निया यांनी सर्व दुर्लक्षित केले. दुसऱ्या दिवशी रेडिओ वरून बातमी ऐकून त्यांचा कॅप्टन स्टॅनली लॉर्ड स्वतःला दोष देऊ लागले.
SS कॅलिफोर्निया ने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मदतीसाठी गेले असते तर RMS टायटॅनिक वरच्या राहिलेल्या १५०० लोकांचा जीव वाचला असता. पण ह्या दुर्घटनेसाठी आपण फक्त ह्या SS कॅलिफोर्निया जहाजालाच किंवा त्याचे कॅप्टन स्टॅनली लॉर्ड याना दोषी धरू शकत नाही, कारण ह्या अपघाताला अनेक कारणे होती
RMS टायटॅनिक चे कॅप्टन स्मिथ हे शेवटपर्यंत स्टेरिंग वर बसून राहिले.. जहाज पहाटे २ वाजून १० मिनिटानंतर मधोमध दोन भागात तुकडे होऊन २ मिनिटाच्या च्या आत मध्ये समुद्रात बुडाले गेले. पोहता येणारे लोक सेफ्टी किट च्या साहाय्याने काही वेळ पोहले मात्र मायनस दोन (-२) डिग्री मध्ये ते १५-२० मिन मध्ये गोठून मृत्यू पावले. पुढे अनेक वर्षे हा प्रश्न विचारला गेला टायटॅनिक ला जबाबदार कोण ?
कॅप्टन स्मिथ
स्वतः प्रवासी की
SS कॅलिफोर्निया जहाज किंवा त्याचे कॅप्टन स्टॅनली लॉर्ड
याला कोणी एक दोषी नसून दोषी होता अतिआत्मविश्वास. मग ती कंपनी असो, कॅप्टन असो किंवा प्रवाशी.
सर्वप्रथम - हे जहाज बुडूच शकत नाही असे समजून पुरेशी सेफ्टी बोट जहाजावर उपलब्ध नव्हत्या हा सर्वात मोठा दोष होता. हिमनगाचे इतर जहाजकडून १३ संदेश मिळून सुद्धा कॅप्टन स्मिथ यांनी जहाजाचा स्पीड कमी केलं नाही किंवा जहाज थांबवलं नाही, कारण ते कंपनीच्या मालकाच्या ऑर्डर पाळत होते. मालकाला दाखवून द्याचे होते RMS टायटॅनिक जगातील वेगवान जहाज आहे.
कॅप्टन स्मिथ हे ६२ वर्षाचे होते त्यांच्यावर ही खूप मोठी जबाबदारी देण्यात आली, कारण कॅप्टन स्मिथ हे १९०८ मध्ये सेवानिवृत्त होऊनसुद्धा, ५ वर्षानंतर त्यांना परत बोलवून ह्या जहाजच्या पहिल्या जरनी साठी घेण्यात आले. कारण White Star Line कंपनीच्या अनेक यशस्वी जहाजांच्या पहिली प्रवासाची सुरवात कॅप्टन एडवर्ड स्मिथ यांचा कडून झाली होती. त्यांच्या डोक्यात फक्त हेच होते हे न बुडणारे जहाज आहे. तसेच त्यांनी सुरक्षा कवायती एकदाही घेतली नाही. नवीन स्टाफ आणि कॅप्टन स्मिथ यांचात बऱ्याच वेळी मिस कम्युनिकेशन होत होते. ऑपरेटर कडून ऐन वेळी जहाज डावीकडे वळवण्याऐवजी उजवीकडे वळवले हा त्याचाच भाग होता.
उच्चभ्रू लोकांनी पहिल्या दिवसापासून एक चूक केली प्रोटोकॉल च्या विरुद्ध पार्टीच्या वेळी पहिल्या दिवसापासून इमेरजन्सी फटाके आणि रॉकेट उडवून हवेत रोषणाई करणे, आणि त्यांना असे वाटत होते, ह्या जहाजाला काही होऊच शकत नाही. अशी जाहिरात खुद्द कंपनीनेच केली होती. ह्यामुळे गरजे च्यावेळी सर्वांनी हेच समजले ह्यांची पार्टी चालू आहे. आणि ह्यामुळे मदतीसाठी SS कॅलिफोर्निया सारखे जहाज अगदी जवळ असून येऊ शकले नाही . SS कॅलिफोर्निया जहाज यांची चूक म्हणजे रात्रीच्या वेळी रेडिओ सिग्नल बंद करणे. आणि त्यांनी फ्लेअर्स आणि रॉकेट्स सिरिअसली न घेणे.
आशा अनेक चूका ज्या अति आत्मविश्वासा मुळे झाल्या त्याचा फटका निष्पाप १२०० लोकांचा जीव गेला. पुढे जाऊन जागतिक लेव्हल वर असा अपघात परत होऊ नये म्हणून सेफ्टी रिलेटेड, रेडिओ, अलर्टस, दुर्बिणीचा वापर, सारखे अनेक कडक नियम बनविण्यात आले.
पुढे जाऊन १९८५ मध्ये ७० वर्षानंतर ,अमेरिकन समुद्र शास्त्रज्ञ रॉबर्ट ब्ला आणि फ्रेंच समुद्र शास्त्रज्ञ एंलुईस मायकल यांनी टायटॅनिक शोधमोहीम केली त्यात जहाजाचे २ तुकडे आणि स्ट्रक्चर एकमेकांपासून ५०० मी. अंतरावर आणि ३८०० मी. खाली भेटले. त्यातील बरेच भाग हे पाण्यात झिजून संपत आले आहेत. पुढील १०-१२ वर्षात समुद्रातील जैव प्राण्यांद्वारे, आणि धातूवरील रासायनिक प्रक्रियेमुळे संपूर्ण जहाज नामशेष होईल.
पदवीधर (B.E )- संगणक शास्त्र
उद्योजक - नवी मुंबई