पाटण|कृष्णाकाठ वृत्तसेवा: भूस्खलन झाल्यामुळे सुमारे 500 पेक्षा जास्त बाधित कुटुंबाचे कायम स्वरुपी पुनर्वसन करण्यासाठी पर्यायी जागेत बांधण्यात येणाऱ्या घरांच्या बांधकामाचा भूमिपूजन समारंभ आज शिदरुकवाडी धावडे ता.पाटण येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे उपस्थितीत पार पडला.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून सातारा जिल्ह्यात पोलीस विभागाच्या बरोबरीने किंवा खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महसूल विभागाला स्कॉर्पिओ गाड्या मिळाव्यात अशी आग्रही मागणी सातारा जिल्ह्यातील महसूल अधिकारी यांची होती.
त्यातही पाटण जावळी महाबळेश्वर यासारख्या दुर्गम तालुक्यात महसूल अधिकारी याना नैसर्गिक आपत्तीचे काम विशेषतः पावसाळ्यात काम करताना खूप अडचणी येत होत्या. याबाबत पाटणचे प्रांत अधिकारी सुनील गाढे यांनी इतर सहकारी महसूल अधिकारी यांचे समवेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांचेकडे ही समस्या मांडली असता त्यांनी देखील ही बाब तात्काळ मान्य केली व जिल्हा नियोजन समितीमधून याबाबत निधी देखील उपलब्ध करून दिला.आणि पोलीस विभाग सोबतच सातारा जिल्ह्यात महसूल विभागाला देखील स्कॉर्पिओ उपलब्ध करून देऊन आज त्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपस्थितीत करण्यात आले.
या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी याना देखील ईनोवा गाड्या देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे आपल्या भाषणादरम्यान सांगितले.
महसूल प्रशासनाला राज्यात प्रथमच सातारा जिल्ह्यात स्कॉर्पिओ वाहने उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच महसूल विभागासाठी स्कॉर्पिओ वाहने देण्यासाठी आग्रही असणारे पालकमंत्री शंभूराज देसाई तसेच यासाठी अखंडपणे पाठपुरावा करणारे जिल्हाधिकारी सातारा जितेंद्र डूडी यांचे जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी ,तहसीलदार ,प्रांत अधिकारी यांनी आभार मानले असून प्रशासकीय काम यामुळे आणखी गतिमान होण्यास निश्चितपणे मदत होणार असल्याचे नमूद केले आहे.