पुरवठा विभागामार्फत अंत्योदय कुटुंबातील महिलांना साडीचे मोफत वाटप
कुंभारगांव| कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
 कुंभारगांव ता पाटण येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीत अंत्योदय कुटूंबातील ८ महिला लाभार्त्याना मोफत साडीचे वाटप करण्यात आले.

सध्या शासनाकडून पुरवठा विभाग व वस्त्रोद्योग विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्रती अंत्योदय कुटुंबात एका साडीचे मोफत वाटप सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज कुंभारगांव वि.का.स सेवा, सोसायटीत बा.दे.सह साखर कारखान्याचे माजी चेअरमन विध्यमान संचालक डॉ दिलीपराव चव्हाण, वि. का. स.सेवा सोसायटीचे चेअरमन रामराव इनामदार,शेंडेवाडी सद्गुरू विकास सोसायटीचे चेअरमन राजेंद्र पाटील, वि. का. सेवा सोसायटीचे संचालक राजेंद्र पुजारी, रमेश यादव, आनंदा माटेकर, सचिव रत्नाकर देसाई सेल्समन विलास मोरे, ईश्वर मोरे ग्रामस्थ संभाजी चव्हाण, सुरेंद्र देसाई, अनिल डांगे यांचे उपस्थितीत साड्यांचे वितरण करण्यात आले.

 पुरवठा विभागाकडून अशा पद्धतीने प्रथमच साड्यांचे वितरण स्वस्त धान्य दुकानातून होत असल्याने नागरिकांमध्ये विशेषतः महिलांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण दिसून आले.