नेटाफिम’ ने पत्र पाठवून केले शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे यांचे कौतुक

तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागाचा पत्रकारितेचा सर्वोच्च वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांना जाहीर झाल्यापासून विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नेटाफिम इरिगेशन पुणेचे व्यवसाय प्रमुख कृष्णात महामुलकर यांनी पोस्टाने अभिनंदनपर पत्र पाठवत डाॅ.संदीप डाकवे यांचे कौतुक केले आहे. सोशल मिडीयाच्या युगात पोस्टाने घरी आलेल्या पत्राने डाॅ.डाकवे भारावून गेले आहेत.

 शेतीमित्र पुरस्कार जाहीर झाल्यानंतर खा.राहूल शेवाळे, अभिनेते दिगंबर नाईक, मुख्यमंत्री सहायता निधी कक्षप्रमुख मंगेश चिवटे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सातारा जिल्हा कृषी अधिक्षक भाग्यश्री फरांदे, कराडचे उपविभागीय कृषी अधिकारी रियाज मुल्ला, मंडळ कृषी अधिकारी सुनील ताकटे, पाटण तालुका कृषी अधिकारी कुंडलिक माळवे व अन्य मान्यवर यांनी डाॅ.डाकवे यांचा गौरव केला आहे. याशिवाय अनेकांनी फोन, मेसेज, व्हाटसअप, फेसबुक आदी सोशल मिडीयाच्या माध्यमातून डाॅ.संदीप डाकवे यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, नेटाफिम इरिगेशन पुणेचे कृष्णात महामुलकर यांनी पोस्टाने डाॅ.संदीप डाकवे यांना पत्र पाठवून अभिनंदन करत कौतुक केले आहे. या अनोख्या पत्राने डाॅ.डाकवे यांना सुखद धक्काच बसला. या पत्रामुळे ते खुश झाले आहेत.

------------------------------------------------------------------------आपुलकी आणि मायेचे पत्र

‘‘सध्याच्या धकाधकीच्या आणि इंटरनेटच्या युगात पत्रलेखन कला दुर्मिळ होत आहे. हे पत्र भविष्यात आणखी जोमाने काम करण्यास ऊर्जा देईल. या आपुलकीच्या आणि मायेच्या पत्राबद्दल नेटाफिम इरिगेषन पुणेचे व्यवसाय प्रमुख कृश्णात महामुलकर आणि त्यांच्या टीमचे मनापासून आभार’’ अशी भावनिक प्रतिक्रिया शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे यांनी याप्रसंगी व्यक्त केली आहे.

--------------------------------------------------------------------------