निशिगंधा बिचकर यांना पीएचडी प्रदान

कुंभारगाव|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
 कुंभारगांव ता पाटण येथील सेवानिवृत्त पोस्टमास्टर निवास विश्वनाथ बिचकर यांची कन्या निशिगंधा निवास बिचकर हिला नुकतीच शिवाजी विद्यापीठाच्या वतीने बिझनेस मॅनेजमेंट विषयातील पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. कॉमर्स अँण्ड मॅनेजमेंट विद्याशाखेत तिने संशोधन केले असून त्यांनी वूमन्स ब्रँड अवेअरनेस प्रेफरन्सेस अँड लॉयल्टी टूवडर्स पर्सनल केअर प्रोडक्ट्स:एन एक्स्प्लोरेटरी स्टडी ऑफ सातारा डिस्ट्रिक्ट या विषयावर संशोधन केले आहे. 

रयत इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेन्ट या संशोधन केंद्रात संशोधन केले त्यांना कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चचे संचालक डॉ बी, एस सावंत,आई श्वेता, भाऊ शुभम यांचे मार्गदर्शन लाभले सध्या त्या मॅनेजमेंट इन्सिट्यूट मध्ये कार्यरत आहेत. 

या यशा बद्दल निशिगंधा चे रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत दळवी, संशोधन केंद्राचे संचालक डॉ डी, बी, जाधव, डॉ बी, एस, सावंत, डॉ सारंग भोला, सर्व शिक्षक, शिक्षेकेतर सेवक, विध्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे तसेच या यशा बद्दल कुंभारगांव परिसरातून त्यांचेवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.