बानुबाई मारुती सावंत यांचे दुःखद निधन.

 

कुंभारगांव| कृष्णाकाठ वृत्तसेवा:

 कुंभारगांव (कळंत्रेवाडी) ता पाटण येथील रहिवाशी व विकास नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास मारुती सावंत व कै निवास मारुती सावंत यांच्या मातोश्री बानुबाई मारुती सावंत यांचे आज सायंकाळी वयाच्या ८० व्या वर्षी राहत्या घरी आकस्मित निधन झाले. त्यांचेवर उद्या गुरुवार दिनांक २८ मार्च 2024 रोजी सकाळी कुंभारगांव येथील वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पश्चात एक मुलगा, सून,नातू असा मोठा परिवार आहे या दुःखद घटनेने कुंभारगांव परिसरात शोककळा पसरली आहे.