या मानधन वाढीसाठी नामदार :शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून गेले अनेक दिवस मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे पाठपुरावा सुरू होता. त्यास अनुसरून राज्यातील पोलीस पाटील यांच्या भरघोस मानधन वाढीच्या संदर्भात घेतलेल्या निर्णया संबंधी महायुती सरकारचे तसेच या प्रश्नासंदर्भात राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा करणारे नामदार शंभूराज देसाई यांचे पाटण तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने पाटण तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष राहुल सत्रे व तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांनी आभार व्यक्त केले.
हा महत्वकांक्षी निर्णय जाहीर झाल्यानंतर पाटण तालुक्यातील उपोषण कर्ते संतोष पवार सह सर्व पोलीस पाटील यांनी महाराष्ट्र शासनाचे शतशः आभार व्यक्त करताना तळमावले येथे एकमेकास पेढे भरवत आंनद उत्सव साजरा केला.याप्रसंगी विजय सुतार, प्रवीण मोरे, अमित शिंदे, महादेव वरेकर, विक्रम वरेकर तसेच विभागातील विविध गावचे पोलीस पाटील उपस्थित होते.