गलमेवाडीतील महिलेचा झऱ्यात बुडून मृत्यू.

तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा:  गलमेवाडी (कुंभारगाव) ता. पाटण येथील वृद्ध महिलेचा गावाजवळच्या झऱ्यात पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना काल घडली. कलाबाई कृष्णत चोरगे (वय ७७) असे संबंधित मृत महिलेचे नाव आहे. ढेबेवाडी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे

याबाबतची अधिक माहिती अशी की कुंभारगाव विभागातील गलमेवाडी येथील कलाबाई चोरगे सकाळी फेरफटका मारण्यासाठी म्हणून घरातून बाहेर गेल्या होत्या. उशिरापर्यंत त्या घरी न परतल्याने कुटुंबीय व ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला असता गावाजवळच स्मशानभूमीनजीक असलेल्या झऱ्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत तेथीलच बाबासाहेब बाबूराव चोरगे यांनी येथील पोलिस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. कऱ्हाड येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर सौ.कलाबाई चोरगे यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. काल सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.