शिव जयंतीनिमित्त वांगव्हॅली पत्रकार संघातर्फे शिव संस्कार महोत्सवाचे आयोजन

 

तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा 

ढेबेवाडी (ता.पाटण) येथील वांगव्हॅली पत्रकार संघाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त शिवसंस्कार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील खेळ, कला, क्रीडा व सामाजिक जीवनाच्या स्मृती पुनर्जीवित करण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली संस्मरणीय स्मृतींचा उजाळा व्हावा यासाठी या शिवसंस्कार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिवसंस्कार महोत्सवात वक्तृत्व, पोवाडा-गीतगायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि वेशभूषा स्पर्धा घेण्यात येणार आहेत. चित्रकला स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावरील प्रसंग हा विषय देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी घरीच चित्र काढून व रंगवून मंगळवार दि.20 फेब्रुवारी, 2024 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत तळमावले येथील वांगव्हॅली पत्रकार संघाच्या संपर्क कार्यालयात जमा करावयाचे आहे. अन्य स्पर्धेसाठी माॅ.साहेब जिजाऊ, छ.शिवाजी महाराज, छ.संभाजी महाराज, गड किल्ले असे विषय आहेत.

वक्तृत्व व गीतगायनासाठी मोबाईल आडवा धरुन त्याचा व्हिडीओ पाठवावा. सदर व्हिडिओ किमान २ ते ५ मिनिटापर्यंत असावा. तसेच घरासमोरील रांगोळीचा व्हिडीओ

आणि शिवकालीन ऐतिहासिक वेशभूषा फोटो यांचेही व्हिडीओ आपले नाव, गाव पत्ता व संपर्कासहीत पाठवावेत. पहिले तीन उत्कृष्ट व्हिडीओ कृष्णाकाठ, कुमजाई पर्व, स्पंदन एक्सप्रेस या यूटयूब चॅनेलवर प्रसारित करण्यात येतील. निंबंध किमान 200 शब्दाचा असावा. प्रत्येक स्पर्धेत तीन क्रमांक काढण्यात येतील. विजेत्यांना सन्मान चिन्ह,

प्रमाणपत्र, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील पुस्तक बक्षीस म्हणून देण्यात येतील. या शिवाय सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. 

स्पर्धेतील विषयानुसार आपापले फोटो आणि व्हिडिओ ९७०२५७७४८५, ९५४५२०९३९३ ८१०८२५३३२३, ९४२१९६३७७५ या पैकी कोणत्याही एका व्हाट्सअप क्रमांकावर टाकावेत. तसेच निबंध आणि चित्रे परीक्षणासाठी वांगव्हॅली पत्रकार संघाच्या तळमावले येथील कार्यालयात पाठवण्याचे आवाहन

आयोजकांनी केले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक असून अधिक माहितीसाठी स्पर्धेचे मुख्य संयोजक संघाचे अध्यक्ष डॉ.संदीप डाकवे, उपाध्यक्ष नितीन बेलागडे, सचिव विजय सुतार यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन संघाच्या वतीने चंद्रकांत चव्हाण, संजय लोहार, तुषार देशमुख, पोपटराव झेंडे, हरीष पेंढारकर, अमोल चव्हाण,प्रमोद पाटील, पोपटराव माने, साप्ताहिक कुमजाई पर्वचे संपादक प्रदिप माने यांनी केले आहे.