अपार कष्ट करून यश संपादन करता येते : प्रा सौ कांचन थोरात

 

 मलकापूर|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात प्रयत्नांची पराकाष्टा करून सर्वोच्च पद मिळवण्याचा सतत प्रयत्न करावा विद्यार्थी दशेपासून सतत अभ्यासात मग्न राहिल्यास कोणतेही काम अवघड नाही असे मत कै रामराव निकम बीएड कॉलेज इंदोली येथे सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या सौ कांचन थोरात यांनी व्यक्त केले आदर्श जुनिअर कॉलेज मलकापूर येथे इयत्ता बारावी शुभचिंतन समारंभात त्या बोलत होत्या. 

याप्रसंगी कराड येथील शासकीय कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस आर पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांच्या अंगी अभ्यासाच्या सोबतच शिस्त महत्त्वाची आहे माणूस शिस्तीमुळे यशस्वी ठरतो या कार्यक्रमासाठी मळाई देवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री पी जी पाटील सचिव श्री अशोकराव थोरात, संचालक श्री वसंतराव चव्हाण, श्री संजय थोरात पालक प्रतिनिधी श्री अभिजीत आडके, सौ शशिकला पाचुंदकर, श्री विकास थोरात, श्री आनंदा कदम, श्री रोहन जैस्वाल, सौ शितल मुसळे, सौ रूपाली पाटोळे, श्री आदिल मोमीन, प्राचार्या सौ कुंभार मॅडम सर्व प्राध्यापक व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते याप्रसंगी वर्षभर घेतलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. 

या वेळी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली प्रा एस एम धोंगडे यांनी विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या श्री आदिल मोमीन व श्री अभिजीत आडके या पालक प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख एस डी पाटील यांनी केले सूत्रसंचालन सौ एस डी खंडागळे यांनी केले आभार कु बागवान एच ए यांनी मानले.