करपेवाडी रोटरी परिवर्तन ग्राम घोषित - रो. प्रमोद शिंदे

 

तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा:
करपेवाडी ता पाटण या गावास रोटरी इंटरनॅशनल या सामाजिक संस्थेच्या रोटरी क्लब ऑफ मलकापूर ता. कराड या शाखेच्या वतीने रोटरी परिवर्तन ग्राम म्हणून घोषित केले. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे कार्यकारी सचिव रो . प्रमोद शिंदे यांच्या शुभ हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले. 

यावेळी डिस्ट्रिक्ट कार्यकारी सचिव रो, प्रमोद शिंदे, अध्यक्ष रो, विलासराव पवार, प्रांतपाल रो, सलीम मुजावर, सचिव रो, विनोद आमले, रो धनाजी देसाई, चंद्रशेखर दोडमनी, दिलीप सपकाळ, शुभांगी शेलार, करपेवाडी सरपंच रमेश नावडकर,उपसरपंच अर्चना करपे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.  

यावेळी कार्यक्रमात रो विलासराव पवार म्हणाले या गावामध्ये विविध प्रकल्प इथून पुढील काळात राबवले जातील यामध्ये शाळेला मदत करणे, शेतीविषयक मार्गदर्शन कार्यशाळा, जलसंधारण कामे करणे, आरोग्य शिबीर आयोजन, नेत्र तपासणी, दंत तपासणी, प्रदुर्षण मुक्त गाव, ग्रामस्वच्छता, शंभर टक्के अंधमुक्त गाव, साक्षरता, महिला सबलीकरण, तंटामुक्त गाव, रोजगार मार्गदर्शन इ प्रकल्प राबवले जाणार आहेत. रोटरी इंटरनॅशनल ११९ वर्षे जुनी आणि २२२ देशात काम करणारी संस्था आहे. 

 रोटरी स्थापना दिन निमित्त गावात विविध उपक्रम राबवण्यात आले यावेळी शाळेला ग्रंथालय कपाट, पुस्तके, मुलांना खाऊ वाटप करण्यात आला आणि ग्रामस्वच्छता करण्यात आली रोटरी या सामाजिक संस्थेचा एक भाग होण्याचे भाग्य करपेवाडी गावास लाभले आहे गावाचे प्रतिनिधी आणि रोटरी सदस्य यांच्या संयुक्त संकल्पनेतून इथून पुढे काम केले जातील.