डॉ.अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून विंग साठी १३ कोटी निधी मंजूर; ग्रामस्थांनी मानले आभार.


विंग|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी अंतर्गत विंग ( क्वाड्रामॅटिक) ते धोंडेवाडी या रस्त्यासाठी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ.अतुल बाबा भोसले यांच्या प्रयत्नातून 13 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला. 

यामुळे गावाच्या विकासात अधिक भर पडली आहे.. विंग गावाच्या या विकासाकरिता मोठा निधी अतुल बाबा यांनी प्रयत्न करून आणल्याबद्दल विंग ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला या विकास कामामुळे ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.

या सत्कार प्रसंगी विंगचे ज्येष्ठ नेते जयवंत माने,विंग ग्रामपंचायत उपसरपंच सचिन पाचूपते, सोसायटीचे चेअरमन राजेंद्र खबाले, ग्रामपंचायत सदस्य विकास माने, अजित खबाले, महादेव पाटील, संभाजी पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. विकास काम मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.