ढेबेवाडी|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
सळवे ता पाटण येथील बोरगेवाडी गावा नजीक महिंद धरणालगत मालकी क्षेत्रातील शेती पिकाच्या संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या तारकुंपणास देण्यात आलेल्या तारेला विधुत प्रवाहामुळे 2 जानेवारी रोजी रात्री 2रानगवे नर जातीचे मृत झाले या बाबत गुप्त माहिती मिळाल्यावर मृत रानगव्याची विल्हेवाट लावत असताना 3 जानेवारी रोजी सकाळी जागेवर दोन आरोपी (1)सत्यवान ज्ञानदेव कदम (2)लक्ष्मण तुकाराम बोर्गे रा बोरगेवाडी ता पाटण जि, सातारा यांना समक्ष जागेवर पकडले असून या गुन्हे प्रकरणी वनपाल सणबुर यांचेकडील प्रथम गुन्हा रिपोर्ट क्र WL-01/2024, 3जानेवारी 2024 ने गुन्हा नोंद झाला असून उप वन संरक्षक श्रीमती अदिती भारद्वाज सहाय्यक वनरक्षक महेश झांझुर्णे यांचे मार्गदर्शनाखाली राजेश नलवडे, वनक्षेत्रपाल पाटण, वनपाल डी, डि, बोडके, वनरक्षक अमृत पन्हाळे, अधिक तपास करत आहेत या कारवाई वेळी वनपाल भोसगाव चे शशिकांत नागरगोजे, हंगामी वनमजूर उपस्थित होते.