प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती तालुकाअध्यक्ष शुभम उबाळेंच्या घरी दिली सदिच्छा भेट.

 ढेबेवाडी |कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
अविकसित ग्रामीण व भौगोलिक दृष्ट्या डोंगरी आणि औद्योगिक दृष्ट्या मागासवर्गीय अशा अविकसित. आणि विकासात्मक दृष्ट्या विविध प्रकल्पांमुळे शासकिय अन्याय व अत्याचार ग्रस्त करण्यात आलेल्या पाटण तालुक्याला खऱ्याअर्थाने न्याय देवून सक्षम बनविण्या साठी शुभम उबाळे या सर्व सामान्य कार्यकर्त्याच्या राहत्या घरी येवून प्रहार जनशक्ती पक्षाच्या तालुका शाखेचे उद्घाटन करून तालुक्यातील कोणत्याही स्वरूपातील अन्यायाविरुद्ध बंड करून संबंधित अन्यायाला नेस्तनाबूत करून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अन्याय ग्रस्तांना योग्यतो न्याय मिळवून देण्याची जबाबदारी, प्रहार जन शक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शुभम उबाळे यांचेवर सोपविण्यात आली.त्याच प्रमाणे येत्या निवडणूक काळात आपल्या पक्षाच्या वतीने सर्व प्रकारच्या निवडणुका लढविण्याची गरज असल्याने त्या लढविण्याचा विश्वास मा.शुभम उबाळे यांनी तालुक्याच्या वतीने बच्चू भाऊ कडू यांना दिला.

या वेळी तालुक्यातील विविध अडचणींबाबत बच्चू भाऊ कडू यांना निवेदने देण्यात आली त्या मध्ये कोयना विभागातून वन्यजीवांकडून होणाऱ्या नुकसान भरपाई कायदे अंतर्गत सुधारणां बाबतचे एक निवेदन, पाटण नगर पंचायतीच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे समावेशन करणे बाबतचे एक निवेदन, अंगणवाडी सेविकांच्या काही मागण्यांबाबतचे एक निवेदन, अशी एक ना अनेक विषयांबाबतची निवेदने संबंधितांकडून देण्यात आली. 

त्याच प्रमाणे राज्यातील किमान ८० ते १०० टक्के दिव्यांग बंधुभगिनींच्या पालकांच्या पश्चात खुपच दयनीय अवस्थेत त्यांना जगावं लागतं. त्यांची सर्व प्रकार ची सेवा सुश्रूशा करणे म्हणजे त्यांच्या कुटुंबियांना खरेतर तारेवरची कसरतच करावी लागत असते.या करीता शासनाकडून दिव्यांग आश्रय संकुल" निर्माण करण्याचा प्रस्ताव देण्या बाबत मा.बच्चू भाऊ कडू यांची भेट घेऊन शक्य तितक्या लवकर सदर संकुलाच्या निर्मिती बाबत ची चर्चा करण्यात येणार आहे. या बाबतची अधिकृत खबर पाटण तालूका प्रहार जन शक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शुभम उबाळे यांनी पत्रकारांशी बोलताना जाहीर केले.