धगधगती मुंबई वर्धापन दिन पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न.

मुंबई| कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

सा. धगधगती मुंबई या वृत्तपत्राच्या वतीने चौदाव्या वर्धापन दिनानिमित्त दिमाखदार गौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला. त्यामध्ये दैनिक महासागर चे मुख्य संपादक श्रीकृष्ण चांडक यांना पत्रकारिता जीवन गौरव पुरस्काराने मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मानचिन्ह, सन्मानपत्र आणि शाल असे या जीवन गौरव पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी व्यासपीठावर अभिनेते किरण माने, दिगंबर नाईक खासदार राहुल शेवाळे आरोग्य दूत मंगेश चिवटे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सोहळ्यात अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.

  यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून खासदार राहुल शेवाळे यांनी धगधगती मुंबई अशीच धगधगत राहावी, धारावीतील प्रश्नावर सतत आवाज उठवून त्यांना न्याय देण्याचे काम संपादक भिमराव धुळप करत आहेत.१४ वर्षे पत्रकारितेचा धर्म पाळून निःपक्षपाती पत्रकारिता करत आहेत. धारावीतील ते शासनाचे एकमेव पत्रकार आहेत. त्यांचे मी अभिनंदन करतो, त्याचबरोबर सर्व पुरस्कार विजेत्यांचेही अभिनंदन करतो. व्यक्तीमुळे पुरस्कार मोठा होतो,ज्याला पुरस्कार दिला जातो. तो आज मोठा झाला आहे. 

वृत्तपत्र,शाळा,हॉस्पिटल काढणे सोपे आहे,मात्र ते चालवणे खूप अवघड आहे,त्याचे उदाहरण म्हणजे भिमराव धुळप आणि आरोग्यदूत मंगेश चिवटे आहेत.हे सहज शक्य होत नाही,त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते,आणि ती मेहनत ही लोक घेतात. धारावीतील सद्याच्या पुनर्वसन कार्यात जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवून धगधगती मुंबई नक्कीच एक चांगले कार्य करत आहे,यापुढे देखील असे सामाजिक,शैक्षणिक कार्य त्यांच्या हातून घडावे अशी आई जगदंबा चरणी प्रार्थना करतो,व पुढील कार्यास शुभेच्छा देतो. 

  मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी सुरुवातीला "आमची मुंबई, तुमची मुंबई व यशस्वी होवो धगधगती मुंबई" ही चारोळी करून वाबळे यांनी मोठे वृत्तपत्र काय बोलतंय, लिहितेय याची पर्वा आम्हाला नाही, मात्र तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे वृत्तपत्र चालवणं हे सर्वात चांगलं काम वाटत,साप्ताहिक किंवा वृत्तपत्र चालवणे हे खूप मोठे काम आहे. १४ वर्षाचा प्रवास हा मोठा आहे, सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करतो.मंगेश चिवटे यांचेही विशेष आभार मानतो. यानंतर मंगेश चिवटे यांनी देखील भिमराव यांचे कौतुक करून सर्वसामान्य लोकांना, रुग्णांना मदत व्हावी यासाठी सतत पाठपुरावा करत असतात. पत्रकार आणि आरोग्यदूत अशा दोन्ही भूमिका निभावणे हे खूप मोठे काम आमचे संपादक मित्र धगधगती मुंबईच्या माध्यमातून करत आहेत. त्यांनी आजपर्यंत ७५० हुन अधिक रुग्णाचे प्राण वाचवले आहेत. यावेळी मुख्यमंत्री सहायत्ता निधी बद्दल चिवटे यांनी सविस्तर माहिती देऊन ज्यांना पुरस्कार दिला जातोय ते माझ्या माहितीप्रमाणे अनेक जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील व्यक्ती आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पुरस्कार देत आहेत.मला ही आरोग्यदूत पुरस्कार देऊन गौरविल्या बद्दल त्यांचे व त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार व्यक्त करतो असे शेवटी चिवटे बोलले, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे,अभिनेते किरण माने, दिगंबर नाईक, ममता सिंधुताई सपकाळ यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गृहविभागाचे अवर सचिव नारायण माने,पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे,खा.राहुल शेवाळे,डॉ संदीप डाकवे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी पत्रकारिता जीवन गौरव - श्री. श्रीकृष्ण चांडक सर, संपादक दै. महासागर, सहकार रत्न - हरिश्चंद्र बाबलिंग जंगम, शिक्षण रत्न - जगदीश मरागजे , वारकरी भूषण - ह.भ.प. प्रवीण शेलार महाराज , समाज रत्न - श्री दीपक लोखंडे समाजसेवक , उद्योग रत्न - कौतिक दांडगे - महाराष्ट्र बाजार पेठ अध्यक्ष, पत्रकारिता गौरव - विवेक भावसार- राजकीय विश्लेषक,जेष्ठ पत्रकार (मंत्रालय), कलारत्न - दिगंबर नाईक, कलाभूषण - सिने अभिनेते किरण माने, आरोग्यदूत-वैद्यकिय रत्न - मंगेश चिवटे,कक्षप्रमुख - मुख्यमंत्री वैद्यकिय सहायता निधी विभाग , युवा उद्योजक - श्रेयस मोहन नायकवडी,

संगीत रत्न (कोयना भूषण) राजाराम बुवा शेलार (भजन सम्राट), शिवाजीराव माटेकर - सहकार क्षेत्र व्यवस्थापन रत्न, गोरखनाथ पोळ सर - उत्कृष्ट संस्थाचालक, यानंतर कर्तृत्ववान महिला सन्मान पुरस्कार 

 ममता सिंधुताई सकपाळ, सौ. कविता राजेंद्र पांचाळ , कायदा रत्न (भूषण) - ऍड रीना संदीप कोरडे, डॉ. प्राची ढोले - पत्रकारीता महिला गौरव पुरस्कार, सौ. विनया महेश निंबाळकर , ऍड. स्मिता चिपळूणकर - मीडिया कायदेविषयक सल्लागार या सर्वांना प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजक संपादक भिमराव धुळप यांनी सर्व मान्यवरांचे ,पुरस्कार विजेत्यांचे,उपस्थितांचे आभार मानले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश दळवी यांनी केले. कार्यकारी संपादक गजानन तुपे यांनी जीवन गौरव पुरस्कार मानपत्राचे वाचन केले. खूप सुंदर असे नियोजन धगधगती मुंबईच्या सर्व टीमने केले होते.

 स्वातंत्र्य मिळवून देण्यात पत्रकारांची भूमिका महत्त्वाची - श्रीकृष्ण चांडक.

देशाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवून देणारे त्याकाळचे पत्रकारच होते. लोकमान्य टिळक,डॉ बाबासाहेब आंबेडकर, आचार्य अत्रे, महात्मा गांधी यांच्यासारखी लोक स्वतः पत्रकार म्हणून देखील काम करत होती,अशी निःपक्षपाती पणे पत्रकारिता करतील तेच या क्षेत्रात टिकतील. समाजाची सेवा कराल तर तुम्हाला पत्रकारिता करता येईल. सामाजिक बांधिलकी जोपासत समाजात राहून काम करतो. आम्ही घरचं फुंकून दिवाळी साजरी करतो असे पत्रकारितेचे काम आहे.जो पर्यंत तुम्ही अन्यायाविरुद्ध वाचा फोडत नाही, तोपर्यत तुमचे वृत्तपत्र चालत नाही, असे वक्तव्य दैनिक महासागरचे संपादक व पत्रकारिता जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी आणि दैनिक महासागर चे मुख्य संपादक श्रीकृष्ण चांडक हे धगधगती मुंबईच्या १४ व्या वर्धापन दिन सोहळ्यात मुंबई पत्रकार संघ, मुंबईतील कार्यक्रमात बोलत होते.  

 आजचे कार्यक्रमाचे आयोजन संपादक भिमराव धुळप करत आहेत.आजचा हा पुरस्कार मुंबई नगरीत होत आहे. सहसा मी पुरस्कार स्वीकारत नाही, मात्र यांच्या आग्रहाखातर हा पुरस्कार घेत आहे, आमचं काम लिहिणं किंवा चार शब्द सांगणं आहे, पण आचार्य अत्रे सांगत 'जनतेसाठी लढणार तो पत्रकार बाकीचे पत्रावलीकार' असे ते म्हणायचे. तुम्ही कितीही लहान असा तुमची लेखणी तुम्हाला श्रेष्ठ बनवते. आजच्या जमान्यात पत्रकार हा पत्रकाराला पुरस्कार देतोय हे फार आश्चर्यकारक आहे.आणि हे जो व्यक्ती करतो,ज्याला समाजासाठी काहीतरी करण्याची भावना असते. ते काम एक साप्ताहिकाचा संपादक करतो हे प्रथमच पाहायला मिळते. राज्यातील प्रत्येक विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान करणे हे फार मोठे कार्य त्यांच्या हातून घडत आहे.त्यांच्या पुढील कार्यास माझ्यातर्फे कायम शुभेच्छा असतील.