कुसुमाग्रज हे मराठी अभिरुचीवर प्रभाव गाजवणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी : श्री.आर.आर.देसाई


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा 
श्री मळाईदेवी शिक्षण संस्था संचलित आ. च.विद्यालय व आदर्श ज्युनियर कॉलेज,मलकापूर येथे कवि श्रेष्ठ वि.वा. शिरवाडकर उर्फ तात्यासाहेब यांचा जन्मदिवस मराठी राज्यभाषा दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

  त्यावेळी बोलताना विद्यालयाचे मराठी भाषा विषय शिक्षक श्री आर.आर.देसाई कुसुमाग्रजां विषयी वरील उद्गार काढले.पुढे ते म्हणाले, कुसुमाग्रज हे मराठी अभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजवणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी,नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघु निबंधकार,आस्वादक समीक्षक,शब्द कलेवर प्रभुत्व असणारे बहुआयामी असे व्यक्तिमत्व होते. मराठी भाषा समृद्ध करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस होय.

कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मराठी भाषा विषय शिक्षक श्री एम.पी. फराळे यांचे हस्ते तसेच सर्व शिक्षकांच्या उपस्थित संपन्न झाले. 

यानिमित्त विद्यालयात वक्तृत्व, निबंध,श्रुतलेखनस्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला होता.

विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या विषयी बोलताना विद्यालयाचे मराठी भाषा विषय शिक्षक श्री एम.पी.फराळे म्हणाले, कुसुमाग्रज साहित्य आणि समाज यांचे नाते मानणारे होते,त्यांचा साहित्य विचार लौकिकतावादी आहे. शिरवाडकरांनी साहित्य आणि जीवनाचा संबंध जोडला आहे. परिसरातील परिस्थितीचे नानाविध संस्कार त्यांच्यावर होत असतात. कुसुमाग्रज हे साहित्याच्या सामाजिकतेचा पुरस्कार आणि जातीतेचा निषेध करणारे होते असे म्हणाले. पुढे ते म्हणाले मराठी भाषेला अतुच्य शिखरावर पोहोचवण्याचे काम अनेक लेखक,कवी,कथाकार,कादंबरीकार,बाल साहित्यकार यांनी आपले साहित्याचे माध्यमातून योगदान दिले आहे. आपणही मराठी भाषा संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक सौ.पी.बी.मोरे यांनी केले,सूत्रसंचालन सौ एस.ए.पाटील यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार सौ.आर.डी.कांबळे यांनी मानले.

कार्यक्रमास संस्थेचे सचिव शेती मित्र अशोकराव थोरात, मुख्याध्यापिका सौ.अरुणा कुंभार,उपमुख्याध्यापक ए.बी.थोरात, पर्यवेक्षक बी.जी.बुरूंगले,सर्व शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.